शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

वसुलीसाठी जिल्हा बॅँकेच्या कर्मचाºयांच्या सुट्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 01:40 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या कर्जवसुलीसाठी झपाटलेल्या बॅँक अध्यक्षांनी मार्च अखेरपर्यंत जिल्हा बॅँकेच्या थकीत कर्जाची वसुली करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी मार्च महिन्यातील शनिवार, रविवारच्या तसेच सण, उत्सवाच्या सुट्या रद्द करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे.

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या कर्जवसुलीसाठी झपाटलेल्या बॅँक अध्यक्षांनी मार्च अखेरपर्यंत जिल्हा बॅँकेच्या थकीत कर्जाची वसुली करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी मार्च महिन्यातील शनिवार, रविवारच्या तसेच सण, उत्सवाच्या सुट्या रद्द करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. सुटीच्या दिवशी आपापल्या कार्यक्षेत्रातील कर्जदाराकडे जाऊन कर्मचारी व अधिकाºयांनी वसुलीसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केदा अहेर यांनी केले आहे.  जिल्हा बॅँकेची आर्थिक परिस्थिती पाहता बॅँकेने पीककर्ज, वाहन कर्जापोटी हजारो कोटी रुपये कर्जवाटप केले असून, नोव्हेंबर २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी जाहीर केल्यानंतर बॅँकेची कर्जवसुली जवळपास ठप्प झाली. पैसे नसल्याचे कारण देत शेतकºयांनी हात वर केले. त्याचबरोबर बॅँकांकडेही रक्कम शिल्लक नसल्यामुळे पैसे येण्या-जाण्याचा मार्ग खुंटला. परिणामी २७०० कोटी रुपये वसुलीअभावी जिल्हा बॅँक आर्थिक संकटात सापडली. या बॅँकेकडे जिल्हा परिषद, पंचायत समित्या, सार्वजनिक बांधकाम खाते अशा शासकीय कार्यालयांकडील रक्कमदेखील अडकून पडल्याने व्यवहार ठप्प झाले. अशा परिस्थितीत शेतकरी कर्जमाफीच्या विषयावरूनही विरोधकांनी रान पेटविल्यामुळे शेतकºयांना कर्जमाफीची आशा लागून राहिली, परिणामी त्यांनी कर्जफेडीकडे पाठ फिरविली. त्यामुळे जिल्हा बॅँकेला ऊर्जितावस्था आणण्यासाठी वसुलीशिवाय पर्यायच नसल्याचे पाहून अध्यक्ष केदा अहेर यांनी कठोर निर्णय घेण्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी ऐपतदारांच्या मालमत्तेवर बोजा चढवून लिलाव करण्याबरोबरच वाहन जप्ती व अन्य कायदेशीर मार्ग अवलंबिण्याचे आदेश त्यांनी बॅँक अधिकारी व कर्मचाºयांना दिले आहेत.अपरिहार्य कारणाखेरीज रजा न घेता कर्जवसुलीसाठी कार्यक्षेत्रात फिरती करून जास्तीत जास्त वसुलीसाठी वेळ देऊन कामकाज करावे व कर्जवसुलीचे उद्दिष्ट गाठावे, असे आवाहन केले आहे. स्वत: अहेर हेदेखील तालुकानिहाय बैठका घेऊन कर्जदारांना पैसे भरण्याबाबत आवाहन करीत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर सोमवारी त्यांनी परिपत्रक काढून जिल्हा बॅँकेच्या सर्व शाखांचे कर्मचारी व अधिकाºयांना मार्च अखेरपर्र्यंत कर्ज वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी मार्च महिन्यातील शनिवार व रविवारी सुटीच्या दिवशी सुटी न घेता वसुलीसाठी दौरे करावेत, अशा सूचना केल्या आहेत.

टॅग्स :bankबँक