चांदवड : तालुक्यातील निमोण येथील जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या शाखेतून चोरट्यांनी तिजोरीतील १९ लाख ३८ हजार ६९६ रुपये चोरून नेल्याच्या घटनेप्रकरणी चांदवड पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांना सोमवारी चांदवडचे प्रथम सत्र न्यायमूर्ती आर. बी. गिरी यांच्या समोर उभे केले असता, न्यायमूर्तीनी त्यांना गुरुवार दि. १६ जुलैपावेतो पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या प्रकरणी विजय वना जाधव (रा. खडकी, ता. चाळीसगाव) व त्यांच्याकडे कामास असलेले अजय रामदास नागणे (रा. हिरापूररोड, चाळीसगाव), शेरु मुनाब शहा ऊर्फ शेरु (रा. न्यायडोंगरी, ता. नांदगाव) या तिघा संशयितांना न्यायालयात हजर केले असता, चार दिवस पोलीस कोठडी दिली आहे. (वार्ताहर)
जिल्हा बॅँक शाखा चोरी प्रकरण तिघा संशयितांना कोठडी
By admin | Updated: July 13, 2015 23:53 IST