शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

जिल्हा बॅँक : संचालकांमध्ये नाराजी

By admin | Updated: January 9, 2016 00:20 IST

सुरक्षेपेक्षा तिजोरीची किंमत ‘जड’; अवाच्या सवा दराने खरेदी?

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या निम्म्याहून अधिक संचालकांवर अपात्रतेची टांगती तलवार असतानाच सीसीटीव्हीच्या वादग्रस्त खरेदीनंतर आता तिजोरी खरेदीही वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.काही दिवसांपूर्वीच झालेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत सुरक्षेचा मुद्दा म्हणून सीसीटीव्हीसह तिजोरी खरेदी करण्यावर संचालकांचे एकमत झाले होते. याला काही संचालकांनी लेखी विरोधही नोेंदविला. सीसीटीव्ही खरेदीच्या वादग्रस्त प्रकरणानंतर काही दिवस उलटत नाही तोच आता जिल्हा बॅँकेच्या व्यवस्थापनाने अवाचे सवा दराने लोखंडी तिजोरी खरेदी करण्याचा घाट घातला आहे. त्यासाठी एका नामांकित कंपनीला थेट कंत्राट देण्याचा अजब ठरावच कार्यकारी संचालक मंडळाच्या बैठकीत झाल्याचे समजते. मुळातच अशा अमुक एका कंपनीच्या नावे ठराव तरी करता येतोे काय? असा प्रश्न काही संचालकांनी आता उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. शिवाय ज्या कंपनीच्या नावे तिजोरी खरेदीचा ठराव केला आहे, त्याच कंपनीच्या नाशिकस्थित एका शोरूममध्ये जिल्हा बॅँकेने खरेदी करण्याचा निर्णय घेतलेल्या अत्याधुनिक लोखंडी तिजोरीचे दर १ लाख ३४ हजार आणि १ लाख ७४ हजार असे कमाल असताना प्रत्यक्षात जिल्हा बॅँकेने तितक्याच वजनाच्या आणि उंचीच्या त्याच कंपनीच्या तिजोऱ्या चक्क सहा लाखांच्या आसपास खरेदी करण्याचा घाट घातल्याची चर्चा आहे. त्यातही या तिजोरी खरेदी करण्यासाठी संबंधित नामांकित कंपनीकडून कोणतीही बॅँक गॅँरंटी न घेताच पावणे दोन कोटींचा धनादेशही त्या कंपनीला एकही तिजोरीचा पुरवठा झालेला नसताना अदा करण्यात आल्याची धक्कादायक माहिती काही संचालकांनीच उघड केली आहे. आता कंपनी एक, त्या कंपनीच्या तिजोरीची उंची आणि वजनही तितकेच मात्र त्याच कंपनीच्या तिजोरीच्या दरांमध्ये अशी तीन ते चार लाखांची प्रचंड मोठी तफावत असल्याने व प्रत्यक्षात जिल्हा बॅँकेने केलेल्या खरेदीचे दर जास्त असल्याने या तिजोरी खरेदीत जिल्हा बॅँकेच्या ‘तिजोरी’वर डल्ला मारण्याचे काम जिल्हा बॅँकेच्या काही संचालक मंडळ व प्रशासनातील मोठ्या माशांनी केल्याची चर्चा आता सुरू आहे. (प्रतिनिधी)