शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कळवणला ५० ट्रॅक्टर जप्त जिल्हा बॅक वसुली मोहीम : ६५ लाखांची थकबाकीही वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 00:52 IST

कळवण : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने वसुली मोहिमेतर्गंत बुधवारी कळवणला राबविलेल्या मोहिमेत ५० ट्रॅक्टर जप्त केले. शिवाय ६५ लाखांची थकबाकी वसुली करण्यात आल्याने थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत.

ठळक मुद्देकळवणला राबविलेल्या मोहिमेत ५० ट्रॅक्टर जप्त वाहने जप्त करून त्यांचा लिलाव करण्यात येणार

कळवण : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने वसुली मोहिमेतर्गंत बुधवारी कळवणला राबविलेल्या मोहिमेत ५० ट्रॅक्टर जप्त केले. शिवाय ६५ लाखांची थकबाकी वसुली करण्यात आल्याने थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत.वाहन कर्ज थकविणाºयांची वाहने जप्त करून त्याचा लिलाव करावा, थकबाकी भरण्यास टाळाटाळ करणाºयांच्या सातबारा उताºयावर बॅँकेचा बोजा चढविण्यात यावा, असा आदेश बॅँकेचे अध्यक्ष केदा पाटील आहेर यांनी अधिकारी व कर्मचारी यांना दिल्याने ही मोहीम राबविण्यात आली. बँकेने थकबाकी वसुली करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतल्याने थकबाकीदार धास्तावले आहेत. थकबाकीदारांमध्ये विविध कार्यकारी संस्थेच्या संचालकाची नावे समाविष्ट असतील तर अशा थकबाकीदार संचालकांवर सहकार कायद्यान्वये अपात्र ठरविण्याचे प्रस्ताव सहकारी संस्था तालुका उपनिबंधक यांच्याकडे दाखल करण्याचे आदेशही अध्यक्ष अहेर यांनी दिला आहे.कर्जाने घेतलेले ट्रॅक्टर जप्त करायला गेल्यानंतर ट्रॅक्टर जागेवर नसल्यास थकबाकीदारांवर गुन्हे दाखल करावेत तसेच ज्या थकबाकीदार सभासदांवर जप्ती बोजे लागले असतील व ते सभासद कर्ज फेडत नसतील तर हे प्रकरण निबंधक कार्यालयात दाखल करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.वसुली पथकाने जप्त केलेल्या ट्रॅक्टरपैकी ७ ट्रॅक्टर मालकांनी थकबाकी भरल्याने त्यांच्यावरील कारवाई टळली आहे. पथकाने उर्वरित ४३ ट्रॅक्टरमालकांना थकबाकी भरण्याचे आवाहन केले आहे. वाहन कर्जाचे कर्जदारांनी नियमित हप्ते भरले व किती थकबाकीदार आहेत याची माहिती घेऊन ज्यांनी पैसे भरले नाहीत त्यांची वाहने जप्त करून त्यांचा लिलाव करण्यात येणार आहे.