शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

पाणी सोडण्यास जिल्हा प्रशासन अनुत्सुक

By admin | Updated: October 18, 2015 00:10 IST

पाणी सोडण्यास जिल्हा प्रशासन अनुत्सुक

नाशिक : महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने जायकवाडी धरणासाठी नाशिक जिल्ह्यातून ४.६० टीएमसी पाणी सोडण्याचा आदेश दिला असला तरी, जिल्हा प्रशासनाने याबाबत अनुत्सुकता दर्शविली आहे. जिल्ह्याच्या वतीने सदरच्या बैठकीत प्रतिनिधित्व करणारे निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी सध्याची टंचाई परिस्थिती पाहता नाशिकच्या धरणांमधून पाणी सोडणे योग्य होणार नसल्याचे स्पष्ट केले; परंतु प्राधिकरणाने आपला हेका कायम ठेवला.औरंगाबाद येथे झालेल्या या बैठकीत नाशिक जिल्ह्यातील धरणांची सद्यस्थिती तसेच संभाव्य पाणी आरक्षणाची माहिती सादर करण्यात आली. गंगापूर धरण समूहातून १.३६ टीएमसी, तर गिरणा खोऱ्यातून ३.२४ टीएमसी असे ४.६० टीएमसी पाणी सोडण्याचा विषय बैठकीत चर्चेला आल्यावर खेडकर यांनी गंगापूर धरणातून पाणी सोडणे योग्य होणार नसल्याचे पटवून दिले. गंगापूर धरण समूहात सध्या असलेला साठा व त्यातून सोडले जाणारे पाणी, वाटेत त्याची होणारी गळती पाहता जायकवाडी धरणापर्यंत किती पाणी पोहोचेल, याविषयी साशंकता व्यक्त केली. जिल्ह्णातील १५७७ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला असल्याने भविष्यात या गावांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी लागेल हे पटवून दिले. ज्यावेळी धरणातून पाणी सोडले जाईल त्यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केल्यावर पोलीस बंदोबस्तात पाणी सोडावे, अशी सूचना प्राधिकरणाने केली. परंतु जिल्ह्णातील सप्तशृंगदेवी व घाटनदेवी या दोन ठिकाणी यात्रा भरलेली असल्याने त्याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे, याशिवाय मोहरम सण व दसरा असल्यामुळे पोलीस यंत्रणेवर ताण पडणार असल्याने पाण्यासाठी पोलीस बंदोबस्त देता येणार नसल्याचे खेडकर यांनी सांगितले. त्याचबरोबर येत्या आठवडाभरात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दसरा व कोजागरी पौर्णिमा अशा दोन पर्वण्या असून, हजारो भाविक रामकुंडावर स्रानासाठी येतील, अशा परिस्थितीत धरणातून पाणी सोडल्यास पूरपरिस्थिती निर्माण होऊन आपत्कालीन घटना घडू शकते. त्याचबरोबर या काळात नदी लगतच्या गावांमध्ये वीज प्रवाह खंडितही करता येणार नसल्याने पाणी सोडण्यात अडचणीच अधिक असल्याचे बैठकीत निदर्शनास आणून देण्यात आले. नाशिक जिल्ह्णाच्या वतीने मांडण्यात आलेली भूमिका प्राधिकरणाने ऐकून घेतली असली तरी, त्यांनी ३१ आॅक्टोबरच्या आत पाणी सोडण्याचा आदेश कायम ठेवला.