शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा प्रशासनाची आता विधानसभेची पूर्वतयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 01:40 IST

लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात उर्वरित कामांचा धडका सुरू झाला असतानाच विधानसभा निवडणुकी-संदर्भातील पूर्वतयारी म्हणून जिल्हा प्रशासनाने कामांचे नियोजन करण्यासही प्रारंभ केला आहे.

नाशिक : लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात उर्वरित कामांचा धडका सुरू झाला असतानाच विधानसभा निवडणुकी-संदर्भातील पूर्वतयारी म्हणून जिल्हा प्रशासनाने कामांचे नियोजन करण्यासही प्रारंभ केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा प्रशासनाने तालुकानिहाय मतदार याद्यांच्या पडताळणीचे काम प्राधान्याने हाती घेण्याचा निर्णय घेतला असून, तालुकानिहाय मयत मतदारांची माहिती मागविली जाणार आहे.लोकसभा निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून जिल्हा प्रशासनाकडून विधानसभेच्या कामकाजाची तयारी सुरू केलेली आहे. निवडणूकप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणूक कामात गुंतलेल्या कर्मचाऱ्यांना काहीअंशी उसंत मिळाली आहे. त्यामुळे लागलीच विधान सभेचे कामकाज हाती घेतले जाणार नसले तरी येत्या पंधरा ते वीस दिवसांत याद्यांच्या पडताळणी कामाला सुरुवात केली जाण्याची शक्यता आहे.  लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूक क्षेत्राची व्याप्ती लक्षात घेता जिल्ह्णातील सर्वच तालुक्यांमधील मतदारांची माहिती गोळा करण्याचे मोठे आव्हान जिल्हा यंत्रणेपुढे आहे. ऐनवेळी धावपळ होण्यापेक्षा आताच कामकाजाला सुरुवात होण्याच्या दृष्टीने नियोजन केले जाणार आहे. मतदारांची एकूण संख्या, घटलेली आणि वाढलेली मतदारसंख्या यांची माहिती घेतली जाणार असून, तालुकानिहाय मयत मतदारांची माहिती प्रथम प्राधान्याने घेतली जाणार आहे.लोकसभा आणि विधानसभेच्या कामाच्या व्याप्तीमध्ये फरक असल्याने विधानसभेच्या एकूणच तयारीचा भाग म्हणून मतदान केंद्रांच्या समन्वयाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी व्यतिरिक्त तीन मतदान केंद्रे मिळून एक अधिकारी नियुक्तीबाबत प्राथमिक चर्चा झाली आहे. प्रत्येक तालुक्यामधील मतदान केंद्र, त्यामधील अंतर आणि संवेदनशील केंद्र यांचा विचार करून समन्वय राखण्याच्या दृष्टीने अतिरिक्त अधिकाऱ्यांची नियुक्ती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संदर्भात अद्याप कोणताही ठोस निर्णय अथवा बैठक झालेली नसली तरी निवडणूकप्रक्रिया सुरळीत पार पडण्याच्या दृष्टीने काही बाबींचा नव्याने विचार केला जाणार आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयElectionनिवडणूकvidhan sabhaविधानसभा