शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आढळले अडीच हजार क्षयरोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 00:34 IST

जिल्ह्यातून क्षयरोग हद्दपार करण्यासाठी शासकीय यंत्रणा झटत असली तरी, अद्याप यंत्रणेला फारसे यश आलेले नाही. २०१८ साली जिल्ह्यात २ हजार ९४८ क्षयरोगी आढळून आले होते.

नाशिक : जिल्ह्यातून क्षयरोग हद्दपार करण्यासाठी शासकीय यंत्रणा झटत असली तरी, अद्याप यंत्रणेला फारसे यश आलेले नाही. २०१८ साली जिल्ह्यात २ हजार ९४८ क्षयरोगी आढळून आले होते. त्यापैकी २८ रुग्ण दगावले तर ९५ टक्के रुग्णांना उपचाराखाली आणण्यास यश आल्याचा दावा जिल्हा क्षयरोग कार्यालयाकडून करण्यात आला आहे.रॉबर्ट कोच यांनी २४ मार्च १८८२ साली क्षयरोगाचा शोध लावला. मायकोबॅक्टरियम ट्युबरक्युलॉसिस नावाच्या जिवाणुमुळे क्षयरोगाची लागण होते. हा आजार मुख्यत: हवेमार्फत पसरतो, असा निष्कर्ष कोच यांनी संशोधनातून लावला होता. त्यामुळे २४ मार्च हा जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो. १९५२ सालापासून बी.सी.जी. लसीचा उपयोग देशात केला जाऊ लागला. क्षयरोगाच्या रुग्णांचे नवीन व पुनर्उपचार घेणारे असे दोन प्रकारांमध्ये वर्गीकरण केले गेले.जिल्ह्यातील ग्रामीण भागात ४५ लाख लोकसंख्येसाठी सुधारित राष्टय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम जिल्हा क्षयरोग नियंत्रण सोसायटीमार्फत हाती घेण्यात आला आहे. या अभियानांतर्गत १६ क्षयरोग पथके, ७० मान्यताप्राप्त सूक्ष्मदर्शक केंद्र व १३८ शासकीय तथा अशासकीय आरोग्य संस्थांच्या सहकार्याने मोहीम राबविली जात आहे. जिल्ह्यात आढळून आलेल्या रुग्णांपैकी १ हजार ५११ रुग्ण थुंकीदूषित क्षयरोगाचे, तर ५७१ रु ग्ण थुंकी अदूषित क्षयरोगी आहेत. तसेच ३५८ रुग्ण हे पुनर्उपचार घेणारे व ५०८ अन्य अवयवांचे रुग्ण असल्याची माहिती जिल्हा क्षयरोग केंद्राकडून प्राप्त झाली आहे.‘हीच वेळ आहे’ असे आहे घोषवाक्ययावर्षी जागतिक क्षयरोग दिनाचे घोषवाक्य ‘हीच वेळ आहे’ असे निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये क्षयरोग निर्मूलनाचे, क्षयमुक्त जगण्यासाठी, सर्व क्षयबाधितांपर्यंत पोहचण्याची, तुम्ही क्षयबाधित आहात का? हे तपासण्याची, सर्व वैद्यकीय व्यावसायिकांपर्यंत पोहचण्याची ‘हीच वेळ आहे’.‘टीबी’ नोटीफाइड आजारभारत सरकारने क्षयरोग (टीबी) हा आजार ‘नोटीफायबल’ म्हणून घोषित केला आहे. त्यामुळे शासकीय अध्यादेशानुसार सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना त्यांच्याकडून निदान करण्यात आलेल्या तसेच उपचार करत असलेल्या या आजाराच्या रुग्णांची माहिती जिल्हा क्षयरोग केंद्राला विहित नमुन्यात देणे बंधनकारक आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलdocterडॉक्टर