चाडेगाव : एकलहरे येथील औष्णिक विद्युत केंद्र सहकारी ग्राहक संस्था व भारत गॅस वितरण यांच्या वतीने सभासदांना ‘क्लासिक प्युअर इट वॉटर फिल्टर’चे वाटप करण्यात आले.एकलहरे वर्कर्स क्लबमध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य अभियंता पंकज सपाटे होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्य अभियंता पी.के. खंदारे, आयटकचे राज्य सचिव राजू देसले, मोहनलाल देवडा, आर.जी. मोराळे, लता संखे, व्ही. आर. हिरे, कान्हू चव्हाण, गणपत म्हस्के, प्रदीप भुसे आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सभासदांना क्लासिक प्युअर इट वॉटर फिल्टरचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष हरिष सोनवणे यांनी केले. यावेळी मनोहर वारके, विष्णुपंत आव्हाड, भाऊसाहेब कळमकर, सुनील मराठे, तुकाराम जगताप, शरदचंद्र खैरनार आदि उपस्थित होते. (वार्ताहर)
एकलहरे येथे वॉटर फिल्टरचे वाटप
By admin | Updated: October 12, 2015 22:19 IST