शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

खैरेवाडी गावात विविध साहित्याचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 18:10 IST

घोटी : इगतपुरी तालुक्यात विविध सांस्कृतिक कार्यक्र मांतून जनजागृती करणारे दिवंगत शाहीर शिवनाथ लक्ष्मण मराडे यांच्या स्मृतीदिनानिमित्ताने अतिदुर्गम भागातील खैरेवाडी गावात विविध साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले.

ठळक मुद्देअत्यंत दुर्लक्षीत खैरेवाडी येथे कळसुबाई मंडळाचे गिर्यारोहक तीन किलोमीटर जंगलातून, डोंगरदऱ्यातुन पायी चालत पोहोचले.

घोटी : इगतपुरी तालुक्यात विविध सांस्कृतिक कार्यक्र मांतून जनजागृती करणारे दिवंगत शाहीर शिवनाथ लक्ष्मण मराडे यांच्या स्मृतीदिनानिमित्ताने अतिदुर्गम भागातील खैरेवाडी गावात विविध साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले.कळसुबाई मित्रमंडळातर्फे या उपक्र माचे आयोजन बुधवारी (दि.२९) आयोजन केले होते. इगतपुरी तालुक्यातिल अतिदुर्गम भागातील घाटनदेवीच्या घाटमाथ्याखाली नाशिक, ठाणे, पालघर ह्या तीन जिल्हाच्या सीमेवरील २०० लोकवस्तीच्या खैरेवाडी येथे आधुनिक जगाची कोणतीही सुविधा नाही. अद्यापही गावाला पक्का रस्ता, विजेची सुविधा उपलब्ध नाही. १ किलोमीटर अंतरावरून महिलांना डोक्यावरून पाणी आणावे लागते. गावातील कोणी आजारी झाले तर डोली करून दवाखान्यात न्यावे लागते. अत्यंत दुर्लक्षीत खैरेवाडी येथे कळसुबाई मंडळाचे गिर्यारोहक तीन किलोमीटर जंगलातून, डोंगरदऱ्यातुन पायी चालत पोहोचले.इगतपुरी तालुक्यातील सुप्रसिद्ध दिवंगत शाहीर शिवनाथ मराडे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पिण्याचे पाणी साठविण्यासाठी पाण्याची टाकी, दप्तरे ठेवण्यासाठी लोखंडी कपाट देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तू देऊन खाऊचे वाटप करण्यात आले.३ किमी पायपीट करून शाळा सांभाळणारे शाळेचे शिक्षक शाम आदमने यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. अभिजित कुलकर्णी यांनी शाहीर मराडे यांच्या कार्याला उजाळा देऊन आदरांजली वाहिली.कार्यक्र माप्रसंगी कळसुबाई मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे, आदिवासी शिक्षक नेते निवत्ती तळपाडे, बजरंग मराडे, आत्माराम मते, हौशीराम भगत, संतोष म्हसणे, अशोक हेमके, सोमनाथ भोर, गोकुळ चव्हाण, बालाजी तुंबारे, प्रविण भटाटे, बाळू आरोटे, गजानन चव्हाण, सुरेश चव्हाण, उमेश दिवाकर, सोमनाथ भगत, प्रशांत जाधव, बाळू शिद, राजू शेंडे, बाळू उघडे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.