शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
3
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
4
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
5
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
6
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
7
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
8
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
9
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
10
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
11
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
12
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
13
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
14
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
15
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
16
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
17
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
18
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
19
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
20
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!

शहरातील विविध शाळांमध्ये पाठ्यपुस्तकांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 00:02 IST

शहरातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. तसेच नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प, गुच्छ देऊन व औक्षण करून स्वागत करण्यात आले. काही शाळांमध्ये पहिल्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आले.

नाशिक : शहरातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. तसेच नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प, गुच्छ देऊन व औक्षण करून स्वागत करण्यात आले. काही शाळांमध्ये पहिल्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आले.शिशुविहार बालक मंदिर सीएचएमई सोसायटी संचलित बालक मंदिर शाळेत पहिल्या दिवशी ढोल-ताशाच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी भूषण गोसावी व संघाचे उपाध्यक्ष क्षत्रिय उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प, पुस्तक भेट देण्यात आले. विभागप्रमुख नीता पाटील यांनी मार्गदर्शन केले.उन्नती माध्यमिक विद्यालयपंचवटी येथील उन्नती माध्यमिक विद्यालयात प्रथम दिनी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब सोनजे, बापूराव शिनकर, राजेंद्र बागड, नीळकंठ खैरनार, उत्तमराव उगले उपस्थित होते. मुख्याध्यापक शिरुडे यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन डी. टी. राणे यांनी केले. कार्यक्रमास शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.देवधर इंग्लिश स्कूलपुणे विद्यार्थीगृह संचलित डॉ. काकासाहेब देवधर शाळेत ढोल-ताशांच्या गजरात तसेच फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करून नवागतांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मेधा कुलकर्णी यांनी स्वागत गीत म्हटले. कार्यक्रमास संचालक संजय गुंजाळ, मुख्याध्यापक मनीषा साठे आदींसह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.उंटवाडी माध्यमिक विद्यालयनाएसोच्या उंटवाडी माध्यमिक विद्यालयात नवगतांचे स्वागत करण्यात आले. यावेळी कार्यकारिणी सदस्य भा. द. गायधनी, नवीन तांबट यांच्या हस्ते पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. मुख्याध्यापक रत्नप्रभा सूर्यवंशी, पर्यवेक्षक अशोक कोठावदे, मधुकर पगारे, दिलीप पवार, शालेय समिती अध्यक्ष पां. म. अकोलकर आदी उपस्थित होते.श्रीरामकृष्ण परमहंस विद्या निकेतनश्रीरामकृष्ण परमहंस विद्या निकेतन, दत्तनगर या विद्यालयात विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. मुख्याध्यापक भारती शिरसाठ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक कमलेश बोडके, सामाजिक कार्यकर्ते कुणाल बोडके उपस्थित होते. यावेळी शेवाळे, स्मिता शिरसाठ, नागरे, कोकणी आदी उपस्थित होते.बिटको हायस्कूलडी. डी. बिटको शाळेत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वैशंपायन, उपाध्यक्ष प्रभाकर कुलकर्णी, सचिव हेमंत बरकले, रोहित वैशंपायन आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक रेखा काळे, जयश्री पेंढारकर यांनी स्वागत केले. कार्यक्रमास उपप्राचार्य कांचन जोशी, सुभाष महाजन, टाकळकर, साहेबराव वाघ, किसन बागुल उपस्थित होते.नालंदा अकॅडमीनालंदा अकॅडमी शाळेत विद्यार्थ्यांच्या स्वागतानिमित्त पताका लावून वर्गांची सजावट करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.ग्लोबल व्हिजन स्कूलतर्फे स्वच्छता मोहीमशाळेच्या पहिल्या दिवशी ग्लोबल व्हिजन इंटरनॅशनल स्कूलतर्फे सिडकोतील काही स्मारकांच्या स्वच्छता उपक्र माचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता.ग्लोबल व्हिजन इंटरनॅशनलच्या विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व आणि राष्ट्रपुरु षांचे कार्य आणि त्यांचे विचार विद्यार्थ्यांच्या अंगी यावे याकरिता शहरातील काही प्रमुख स्मारकांची स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नवीन नाशिक येथील महाराणा प्रताप चौक येथील महाराणा प्रताप पुतळा, अहिल्याबाई होळकर, पाथर्डी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, सिडको येथील स्टेट बँक आॅफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, यांची साफसफाई करण्यात केली. शाळेचा पहिला दिवस पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छ भारत अभियानात सहभागी होऊन एक नवा पायंडा शाळेच्या विद्यार्थ्यांनी घालून दिला आहे.

टॅग्स :municipal schoolमहापालिका शाळा