शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरला साहित्यसेवा पुरस्कारांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 01:27 IST

सिन्नर : महाराष्ट्र साहित्य परिषद सिन्नरच्या वतीने राज्यस्तरीय साहित्यसेवा वाङ्मय पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पडला.

ठळक मुद्देराज्यस्तरीय साहित्यसेवा वाङ्मय पुरस्कार वितरण सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : महाराष्ट्र साहित्य परिषद सिन्नरच्या वतीने राज्यस्तरीय साहित्यसेवा वाङ्मय पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पडला.व्यासपीठावर कवी गीतकार प्रकाश होळकर, खलील मोमीन, विवेक उगलमुगले, मनीषा कुलकर्णी, जयश्री वाघ, वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत, उद्योजक पुंजाभाऊ सांगळे, श्रीमंत थोरले बाजीराव पतसंस्थेचे अध्यक्ष नारायण वाजे, अनिल सरवार, नारायण क्षीरसागर, उद्योजक एम. जी. कुलकर्णी, रमेश पगार, अ‍ॅड. राजेंद्र चव्हाणके, वृषाली सानप, के. एल. राठी आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रामीण साहित्याच्या निर्मितीत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे नाव भविष्यात अभिमानाने घेतले जाईल. कारण ग्रामीण साहित्यिकांना उभारी देण्याचे उल्लेखनीय कार्य या परिषदेच्या माध्यमाने होत असल्याचे प्रतिपादन कवी विजयकुमार मिठे यांनी केले. कवी प्रकाश होळकर यांनी नामवंत साहित्यिक सिन्नरच्या भूमीत आले, ही अभिमानाची गोष्ट असल्याचे नमूद केले. कवी रवींद्र कांगणे यांनी प्रास्ताविक, तर प्रा. जावेद शेख यांनी सूत्रसंचालन केले. नीतेश दातीर यांनी आभार मानले. असे आहेत पुरस्कारार्थी...कविता विभागात संजय चौधरी यांच्या ‘कविता माझी कबर’, मनोहर विभांडीक यांच्या ‘ह्या एका दुएसाठी’, संतोष साळसकर (माती हरवल्या कविता) कथासंग्रह प्रकारात दिनकर कुटे (कायधूळ), विजय खाडिलकर (नुक्कड), छाया बेले (वैशाख वणवा) तर कादंबरी प्रकारात बाळ भारस्कर (युगार्त), सुनील जवंजाळ (काळीज काटा), ललित प्रकारात अशोक कोतवाल (दाल गंडोरी), अशोक कोळी (अशानं असं होतं), अनंत चौधरी (उंबरगुज), बालवाङ्मय प्रकारात फारूक काझी (प्रिय अब्बू), एकनाथ आव्हाड (मिसाइल मॅन), अशोक सोनवणे (खिडकीबाहेरचे जग) तर मेंढी येथील सहारा व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक मधुकर गिते यांना दलित मित्र, सुमंतकाका गुजराथी यांना सामाजिक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.