दाभाडी : वर्ष सरतेवेळी तरुणांकडून मोठ्या प्रमाणात खर्च करीत जल्लोष केला जातो, मात्र वायफळ खर्चाला फाटा देत माणुसकी फाउण्डेशनने पैसा जमवून ज्या गरीब नागरिकांना एक वेळ जेवण मिळत नाही, त्यांच्या अंगावर कपडे नाहीत अशा गरजूंना कपडे व खाद्यपदार्थ भेट दिले.दाभाडीसह परिसरात व मालेगावमध्ये अनेक नागरिक बेघर आहेत. मोसम पूल, संगमेश्वर, किदवाई रोड, गूळ बाजार, तांबा काटा, नंदन टॉवर, जुना स्टॅण्ड, शिवतीर्थ, नवीन बसस्थानक, कॅम्परोड, कॉलेजरोड, मोची कॉर्नर, एकात्मता चौक, सोमवार बाजार अशा अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला गरीब बांधव राहत असून, त्यांना एक वेळचे खाणे अवघड आहे. अशा बांधवांना माणुसकीच्या नात्याने नवीन कपडे, पादत्राणे, टोपी, उपरणे व अल्पोपाहार देत माणुसकी फाउण्डेशनतर्फे समाजसेवेचा एक नवीन उपक्र म घेण्यात आला.दाभाडीत हजारो झाडे लावून त्याच्या संरक्षणासाठी जाळ्या करण्यात आल्या. दर आठवड्याला त्या झाडांना टँकरद्वारे पाणी देण्यात येते. वयोवृद्धांसाठी मोफत नेत्रतपासणी शिबिर घेऊन बाधित रुग्णांची शस्रक्रिया करून देण्यात आली. फाउण्डेशनचे अध्यक्ष नाना निकम, मिलिंद निकम, किशोर निकम, सचिन मानकर, आनंदा नामदास, गोरख मानकर, भाल्या निकम, गौरव निकम, जय शिंदे, आप्पा सोनवणे, कुणाल निकम, कारभारी मानकर, वैभव पाटील, अरुण मानकर, अजय पगारे, अंताजी निकम समाजसेवेचे काम करीत आहेत.वर्ष सरतेवेळी तरुण बांधवांकडून विनाकारण मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. या वायफळ खर्चाला फाटा देत माणुसकी फाउण्डेशनतर्फेजनसेवा हीच ईश्वर सेवा मानून गरजू लोकांना कपडे व खाद्यपदार्थ वाटप करण्यात आले असल्याचे माणुसकी फाउण्डेशनचे संस्थापक नाना निकम यांनी सांगितले, तर गरिबांच्या जीवनाशी एकरूप झाल्याशिवाय समाजसेवा करण्यास पात्र होता येत नाही. चुकीचा खर्च टाळत गरीब लोकांना कपडे व खाद्यपदार्थ वाटप करून समाजसेवा करण्याचा आनंद वेगळाच असतो, असे फाउण्डेशनचे सदस्य किशोर पगार यांनी सांगितले.
माणुसकी फाउण्डेशनतर्फे कपडे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 23:49 IST
दाभाडी : वर्ष सरतेवेळी तरुणांकडून मोठ्या प्रमाणात खर्च करीत जल्लोष केला जातो, मात्र वायफळ खर्चाला फाटा देत माणुसकी फाउण्डेशनने ...
माणुसकी फाउण्डेशनतर्फे कपडे वाटप
ठळक मुद्दे समाजसेवेचा वसा : निराधारांना मिळाला आधार