पांडाणे : येथील ज्ञानगंगा बहुद्देशीय संस्थेमार्फत विविध पुरस्कारांचे वितरण खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. लोककवी विठ्ठल वाघ साहित्य पुरस्कार पेण, ता. रायगड येथील गीतकार विनायक पवार यांच्या पिढीजात वर्तमान, तर मातोश्री लक्ष्मीबाई जाधव साहित्य पुरस्कार यवतमाळ येथील अनंता सूर यांना वाताहत या काव्यसंग्रहाला व वैद्यकीय क्षेत्रातील पांडाणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. लक्ष्मण साबळे यांना उत्कृष्ट सेवेचा पुरस्कार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर अमृता पवार, संदीप जगताप, भास्कर भगरे, सुरेश डोखळे, ज्योती देशमुख लखमापूर, संजय कड, संदीप कड, संपत जाधव, दशरथ गांगोडे, गंगाधर निखाडे ओझरखेड, राकेश थोरात आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिन कड यांनील, तर आभार संपत जाधव यांनी मानले.
पांडाणेत पुरस्कारांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 00:21 IST