शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’ प्रगतीचा विभागीय आयुक्तांकडून आढावा१८५ हेक्टर ताब्यात : दोनशे कोटी रुपयांचे वाटप; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीची पूर्वतयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 01:11 IST

मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्गासाठी जमीन खरेदीच्या आजवरच्या परिस्थितीचा आढावा गुरुवारी विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी नाशिक व नगरच्या जिल्हाधिकाºयांकडून जाणून घेतला.

ठळक मुद्देदोनशे कोटी रुपये जमीन मालकांच्या बॅँक खात्यात जमा बैठकीची पूर्वतयारी म्हणून समृद्धीचा आढावा१४९.७७ कोटी रुपये अदा विरोध करणाºया शेतकºयांचे प्रमाण अधिक

नाशिक : मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्गासाठी जमीन खरेदीच्या आजवरच्या परिस्थितीचा आढावा गुरुवारी विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी नाशिक व नगरच्या जिल्हाधिकाºयांकडून जाणून घेतला. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व इगतपुरी या दोन तालुक्यातून १८५ हेक्टर जमिनीची खरेदी शेतकºयांकडून करण्यात आली असून, त्यापोटी सुमारे दोनशे कोटी रुपये जमीन मालकांच्या बॅँक खात्यात जमा करण्यात आले आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १६ नोव्हेंबर रोजी मुंबईत समृद्धीच्या प्रगतीबाबत राज्यातील अधिकाºयांची बैठक बोलाविली आहे. या बैठकीची पूर्वतयारी म्हणून समृद्धीचा आढावा घेण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यात समृद्धीला सर्वाधिक विरोध झालेल्या सिन्नर तालुक्यातच शेतकºयांचे मन वळविण्यात प्रशासनाला मोठे यश मिळाले असून, तालुक्यातील १७ गावांतील २९३ शेतकºयांची १३२.९६ हेक्टर क्षेत्र जागा थेट खरेदीने समृद्धीसाठी घेण्यात आली आहे. त्यापोटी १४९.७७ कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत. इगतपुरी तालुक्यात मात्र जमिनीसाठी राजी होण्याचे प्रमाण कमी आहे. १६ गावांतील १४७ शेतकºयांची ५३.३३ हेक्टर क्षेत्र जमीन खरेदी करण्यात आली असून, त्या पोटी ६५.५२ कोटी रुपये रक्कम देण्यात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी जानेवारी महिन्यात या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन करण्याचे ठरविले आहे, तत्पूर्वी अधिकाधिक जमीन रस्ते विकास महामंडळाच्या ताब्यात दिली जावी यासाठी प्रशासनातील अधिकाºयांना बजावण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी बोलाविलेल्या बैठकीत याच विषयावर चर्चा होणार असून, नाशिक जिल्ह्णात समृद्धी महामार्गाला विरोध करणाºया शेतकºयांचे प्रमाण अधिक असल्याने त्यादृष्टीने या बैठकीकडे साºयांचे लक्ष लागून आहे.