शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

१६०० जात पडताळणी दाखले वितरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 01:11 IST

नाशिक : तांत्रिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आल्याने जात पडताळणी कार्यालयात प्रकरणे दाखल करण्यासाठी तसेच पडताळणी प्रमाणपत्र घेऊन जाण्यासाठीची गर्दी वाढली आहे. त्यामुळे जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयाने कामाचा वेग वाढविला असून, जादा वेळ काम करीत कार्यालयाने पंधरा दिवसांत १६०० जात पडताळणी प्रमाणपत्रांचे वितरण केले आहे. विशेष म्हणजे दररोज दाखल होणाऱ्या प्रकरणांपैकी काही प्रकरणे काही दिवसांत देण्यात आली असल्याचा दावा पडताळणी समितीने केला आहे.

ठळक मुद्देसमाज कल्याण विभाग : पंधरा दिवसांतील कार्यवाही अर्जदार त्रुटींमुळे ८५० अर्ज शिल्लक

नाशिक : तांत्रिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आल्याने जात पडताळणी कार्यालयात प्रकरणे दाखल करण्यासाठी तसेच पडताळणी प्रमाणपत्र घेऊन जाण्यासाठीची गर्दी वाढली आहे. त्यामुळे जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयाने कामाचा वेग वाढविला असून, जादा वेळ काम करीत कार्यालयाने पंधरा दिवसांत १६०० जात पडताळणी प्रमाणपत्रांचे वितरण केले आहे. विशेष म्हणजे दररोज दाखल होणाऱ्या प्रकरणांपैकी काही प्रकरणे काही दिवसांत देण्यात आली असल्याचा दावा पडताळणी समितीने केला आहे.तांत्रिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आल्याने जात पडताळणी कार्यालयात प्रकरणे दाखल करण्यासाठी तसेच पडताळणी प्रमाणपत्र घेऊन जाण्यासाठीची गर्दी वाढली आहे. विशेषत: जून महिन्यात मोठ्या प्रमाणात जात पडताळणी प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. गेल्या पंधरा दिवसांत १६०० जात पडताळणी दाखले वितरित करण्यात आले आहेत तर अर्जदारांच्या त्रुटींमुळे ८५० प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आली असून, संबंधितांना त्रुटींबाबतची माहिती कळविण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले.जात पडताळणीसाठी दररोज दीडशे ते दोनशे अर्ज दाखल होत असतात. गेल्या शुक्रवारी तब्बल अडीचशे अर्ज एकाच दिवशी दाखल झाले होते. सोमवारी १९० विद्यार्थ्यांनी पडताळणीसाठी अर्ज दाखल केले. शैक्षणिक कामासाठी विद्यार्थ्यांना जात पडताळणीचे दाखले अनिवार्य असल्याने कार्यालयात विद्यार्थ्यांची गर्दी अचानक वाढली आहे.प्राप्त अर्जांच्या त्रुटी कमी करण्यासाठी समाजकल्याण जात पडताळणी विभागाने २१ ते २५ रोजी विशेष शिबिरही घेतले होते. या शिबिरास फारसा प्रतिसात लाभला नाही. आजवर २१५८ अर्जांच्या त्रुटींची पूर्तता करण्यात आली असून, आता केवळ ८५० अर्जदार त्रुटी शिल्लक आहेत. तर गेल्या महिनाभरात सुमारे १९०३ नवीन अर्ज दाखल झाले आहेत. रोज अर्ज दाखल करण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी वाढतच असून, विद्यार्थ्यांची प्रकरणे दाखल करून घेतली जात असून त्यांना लवकरात लवकर पडताळणी प्रमाणपत्रे देण्यासाठीच कामाचा वेग वाढविण्यात आला आहे. पडताळणी प्रमाणपत्रे देण्यासाठी पाच महिन्यांचा कालावधी असतो. परंतु विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी लागणाºया प्रमाणपत्राची आवश्यकता लक्षात घेऊन या कार्यालयाकडून वेगाने प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही केली जात असल्याचे उपायुक्त वंदना कोचुरे यांनी सांगितले.जात पडताळणी पूर्ण होऊन अजूनही सुमारे अडीच हजार प्रमाणपत्रे कार्यालयातच पडून आहेत. संबंधित विद्यार्थ्यांना याबाबत कळविण्यात येऊनही पडताळणी प्रमाणपत्र घेण्यासाठी विद्यार्थी येत नसल्याचे वास्तव आहे. संबंधितांना ३०७५ एसएमएस, २२०० पत्रे पाठविण्यात आलेली आहेत. संबंधितांनी तत्काळ कार्यालयाशी संपर्क साधून आपापली जात पडताळणी प्रमाणपत्रे घेऊन जावीत. ज्या विद्यार्थ्यांना येणे शक्य नाही त्यांनी त्यांच्या कुटुंबातील आई, वडील, भाऊ, बहीण यांच्याकडे ओळखीचे योग्य पुरावे पाठविल्यास त्यांनादेखील सर्वशहानिशा करूनच प्रमाणपत्र दिले जाईल.- वंदना कोचुरे, उपायुक्त, जात प्रमाणपत्र पडताळणी समिती