शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

ऊसाला बोलीप्रमाणे भाव न दिल्याने संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 19:01 IST

लोहोणेर : बंद अवस्थेत असलेला वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना डी. व्ही.पी. संचलित धाराशिव साखर कारखान्याने भाडे तत्वावर चालविण्यास घेतला असून सदर कारखाना चालू होऊन सुमारे एक महिन्यांचा कालावधी उलटला असून गव्हाण पूजनाच्या दिवशी अध्यक्ष अभिजित पाटील यांनी जाहीर केल्याप्रमाणे अद्यापही गाळपास आलेल्या ऊसाला जाहीर केलेल्या बोलीप्रमाणे भाव न दिल्याने वसाकास ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकºयांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देलोहोणेर : (वसाका) धाराशिव साखर कारखाना अध्यक्षांवर शेतकरी नाराज

लोहोणेर : बंद अवस्थेत असलेला वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना डी. व्ही.पी. संचलित धाराशिव साखर कारखान्याने भाडे तत्वावर चालविण्यास घेतला असून सदर कारखाना चालू होऊन सुमारे एक महिन्यांचा कालावधी उलटला असून गव्हाण पूजनाच्या दिवशी अध्यक्ष अभिजित पाटील यांनी जाहीर केल्याप्रमाणे अद्यापही गाळपास आलेल्या ऊसाला जाहीर केलेल्या बोलीप्रमाणे भाव न दिल्याने वसाकास ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकºयांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.वसाकाच्या भाडेकरू संस्थेने म्हणजेच धाराशिव साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी दिनांक ११ नोव्हेंबर रोजी गव्हाण पूजनाच्या दिवशी आपण इतर लगतच्या कारखान्याच्या तुलनेत एक रु पया जास्त भाव देऊ असे जाहीर केले होते. मात्र या घोषणेला एक महिना पूर्ण झाला असला तरी अद्याप २००० रु पयापेक्षा जास्त भाव न दिल्याने ऊस उत्पादक, पुरवठादार शेतकरीवर्गात संभ्रम निर्माण झाला आहे.या उलट वसाका शेजारील द्वारकाधीश सहकारी साखर कारखान्याने २३७१ रु पये इतका भाव जाहीर केला असून रोख स्वरूपात पेमेंट अदा करण्यास सुरुवात केली आहे. वसाका व द्वारकाधीश यांच्या पेमेंट मध्ये सुमारे ३७१ रु पयांची तफावत जाणवत असून वसाका कारखाना हे उर्वरित पेमेंट कधी देणार याकडे ऊस पुरवठादार शेतकºयांचे लक्ष केंद्रित झाले आहे.वसाकाने शुक्रवार पर्यत सुमारे ४७,७६० मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले असून सुमारे ३३,७०० पोते साखर निर्माण केली आहे. सरासरी साखर उतारा ७.६४ टक्के इतका मिळाला आहे. वसाकाच्या व्यवस्थापन मंडळ हे सध्या तरी कार्यक्षेत्रातील उसा ऐवजी गेटकेनचा ऊस गाळप करण्यात धन्यता मानत असून कार्यक्षेत्रातील आजी, माजी संचालक ज्यांनी वसाकावर १०-१५ वर्ष सत्ता भोगली ते सुद्धा आपला ऊस तुटावा म्हणून वसाकात खेटे घालीत आहेत. ज्या प्रमाणे वसाका शेजारील द्वारकाधीश साखर कारखान्याने २३७१ रु पये प्रति टन भाव दिला त्याच प्रमाणे वसाकाने सुध्दा जाहीर केल्या प्रमाणे ऊस भाव द्यावा व ज्यांनी या आधी ऊस पुरवठा केला असेल त्यांना उर्वरित पेमेंट अदा करावे अशी मागणी ऊस पुरवठादार शेतकºयांनी केली आहे. (वसाकाचा फोटो वापरणे)