मालेगाव शहरातून दरेगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर सुपर मार्केटपासून सिमेंटचा रस्ता तयार करण्यात येत आहे. रस्त्याच्या एका बाजूने करण्यात येणाऱ्या सिमेंटच्या रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने पाच महिने सुरू होते. हा रस्ता नूर बाग कमानीपर्यंत करून साेडून देण्यात आला आहे. किमान एका बाजूने का होेईना, परंतु दरेगावपर्यंंत वेगात रस्त्याचे काम पूर्ण झाले असते तर एका बाजूने वाहतूक सुरू करून वाहतूक कोंडी रोखता आली असती. मात्र नूरबागपर्यंत सिमेंट रस्ता करून तसाच साेडून देण्यात आल्याने पुढे तरी हा रस्ता होतो की नाही, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. जाफरनगर भागात प्रचंड रस्ता उखडला असून पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांना वाहने नदीतून नेल्याचा भास होतो. संबंधितांनी दरेगावपर्यंत सिमेंटचा एकतर्फी रस्ता पूर्ण करावा, अशी मागणी होत आहे.
मालेगाव-दरेगाव रस्त्याला अवकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:15 IST