शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी केला आॅनलाईन प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 18:37 IST

जिल्हा परिषदेच्या शाळा देखील बंद असून, ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, ते टाळण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील तंत्रस्नेही शिक्षकांनी पुढाकार घेऊन साधारणत: चौथी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आॅनलाईन शिक्षण सुरू केले आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांना दररोज शिक्षणाचे धडे देण्यास सुरूवात २१४ शिक्षकांचा सहभाग : व्हॉटस्अपचाही वापर

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने शाळा, महाविद्यालये सुरू करण्याबाबत वेळापत्रक ठरवून दिले असून, शक्यतो पुढच्या महिन्यापासून शैक्षणिक सत्र सुरू होणार असले तरी, जिल्हा परिषदेच्या २१४ शिक्षकांनी मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना आॅनलाईन शिकविण्यास सुरूवात केली आहे तर ६० शिक्षकांनी व्हाटस्अ‍ॅपच्या माध्यमातून शिक्षणाचा श्रीगणेशा केला आहे.

स्थानिक परिस्थिती लक्षात घेता ज्या शिक्षकांना शक्य आहे त्यांनी स्वयंप्रेरणेने आॅनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे कार्य करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्यावतीने करण्यात आले आहे. कोरोनाच्या ापार्श्वभूमीवर शालेय कामकाज सुरू करण्यााबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी वेळापत्रक ठरवून दिले असून, त्यानुसार निम्मे शैक्षणिक सत्र संपुष्टात येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते. जिल्हा परिषदेच्या शाळा देखील बंद असून, ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, ते टाळण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील तंत्रस्नेही शिक्षकांनी पुढाकार घेऊन साधारणत: चौथी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आॅनलाईन शिक्षण सुरू केले आहे. त्यात बागलाण १२, दिंडोरी १२१ इगतपुरी १, मालेगाव ५, नाशिक ५, निफाड १६, येवला ३० असे एकूण १९० शिक्षकांचा सहभाग आहे. ६० शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या पालकांच्या भ्रमणध्वनीचा ग्रृप करून त्याद्वारे विद्यार्थ्यांना दररोज शिक्षणाचे धडे देण्यास सुरूवात केली आहे. या उपक्रमास पालक, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायतीचे या कामी सहकार्य मिळाले असून, शिक्षकांच्या या स्वयंप्रेरणेचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब शिरसागर, शिक्षण सभापती सुरेखा दराडे, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, शिक्षणाधिकारी वैशाली वीर यांनी कौतुक केले आहे.

टॅग्स :Educationशिक्षणnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद