शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

जि. प. सीईओ भुवनेश्वरी यांची बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 01:46 IST

नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी यांची अवघ्या सहा महिन्यांतच भंडारा जिल्हा परिषदेत बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी अद्याप कोणाची नियुक्ती करण्यात आलेली नसली तरी, विभागीय आयुक्त कार्यालयातील उपआयुक्त दिलीप स्वामी यांच्या नावाची चर्चा होऊ लागली आहे.

नाशिक : नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी यांची अवघ्या सहा महिन्यांतच भंडारा जिल्हा परिषदेत बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी अद्याप कोणाची नियुक्ती करण्यात आलेली नसली तरी, विभागीय आयुक्त कार्यालयातील उपआयुक्त दिलीप स्वामी यांच्या नावाची चर्चा होऊ लागली आहे.एस. भुवनेश्वरी यांची जुलै महिन्यात नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली करण्यात आली होती. जिल्हा परिषदेचे कामकाज समजावून घेत असतानाच जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व सदस्यांशी त्यांचे पटेनासे झाले. त्यातून प्रशासन विरुद्ध पदाधिकारी असे चित्र निर्माण होऊन त्यातून सर्वसाधारण सभा, स्थायी समितीच्या सभेत वादंग निर्माण झाले होते.जिल्हा परिषदेचा निधी अखर्चित राहणे, अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याविषयी भुवनेश्वरी यांच्या विरोधात तक्रारी करण्यात आल्या होत्या. जिल्हा परिषदेच्या कामकाजाबाबत थेट विभागीय आयुक्त व शासनाकडेही तक्रारी करण्यात आल्या होत्या. अशातच विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान भुवनेश्वरी यांचे पती व विभागीय उपायुक्त प्रदीपचंद्र यांची भंडारा जिल्हाधिकारी म्हणून बदली झाल्यानंतर पती-पत्नी एकत्रिकरणांतर्गत भुवनेश्वरी एस. यांनी स्वत:हून नाशिकहून बदलून जाण्यासाठी प्रयत्न चालविले होते. त्यानुसार राज्य सरकारने गुरुवारी अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना भुवनेश्वरी यांचीही बदली केली आहे.रिक्त जागेवर अद्याप नियुक्ती नाही़भुवनेश्वरी यांच्या बदलीचे वृत्त जिल्हा परिषदेत येताच, त्याविषयी संमिश्र मते व्यक्त करण्यात आली. भुवनेश्वरी यांच्या जागेवर मात्र कोणाची नियुक्ती केलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार विभागीय आयुक्तालयातील उपायुक्त दिलीप स्वामी यांची नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक होणार असल्याची चर्चा होऊ लागली आहे.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदTransferबदलीGovernmentसरकार