शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

आधार जोडणीतही अनुत्साह : बीएलओ वैतागले

By admin | Updated: May 14, 2015 00:17 IST

दीड लाख दुबार मतदारांना नोटिसा

नाशिक : मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणाचा भाग म्हणून एकापेक्षा अधिक ठिकाणी नाव असलेल्या मतदारांची नावे कमी करण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने हिरवा कंदील दर्शविल्याने जिल्ह्यात सुमारे दीड लाख मतदारांची दुबार नावे आढळून आली असून, या सर्वांना नोटिसा बजावण्याचे काम केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (बीएलओ) सोपविण्यात आलेले असले तरी, मतदार यादीत अपूर्ण असलेल्या पत्त्यामुळे दुबार मतदार सापडणे मुश्कील झाले आहेत. गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा व पाठोपाठच्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान निवडणूक आयोगाने मतदार पुनर्निरिक्षण मोहीम राबवून मतदार याद्यांचे अद्यावतीकरण केले, त्यात छायांकित मतदार यादी बरोबरच मतदारांचे भ्रमनध्वनी क्रमांकही गोळा करण्यात आले, परंतु एकापेक्षा अधिक ठिकाणी नावे असलेल्या मतदारांचे नावे कमी न करण्याची दक्षता आयोगाने घेतली होती. लोकसभा निवडणुकीत लाखो मतदारांचे नावे कमी करण्यात आल्याच्या तक्रारी थेट न्यायालयापर्यंत पोहोचल्याने आयोगाने विधानसभा निवडणुकीत दुबार नावे जैसे थे ठेवण्यात आले होते. आता मात्र निवडणुकीचा माहोल संपल्याने पुन्हा एकवार मतदार याद्यांचे अद्यावतीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून, त्यात मतदारांचे   आधारक्रमांक यादीशी जोडण्याबरोबरच दुबार नावे कमी करण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्णातील एकूण मतदारांच्या संख्येत एक लाख ५३ हजार ४४५ मतदारांची एकापेक्षा अधिक ठिकाणी नावे आढळून आल्याने त्यांना निवडणूक शाखेने संभाव्य दुबार नावे असलेले मतदार म्हणून संबोधले आहे. अशा संभाव्य मतदारांना त्यांच्या पत्त्यावर नोटिसा बजावून कोणत्या मतदारसंघात वा केंद्रात नाव ठेवायचे याबाबत विचारणा केली जाणार आहे, परंतु निवडणूक शाखेने तयार केलेल्या नोटिसांवर मतदारांचे पूर्ण पत्ते नसल्याने या नोटिसा बजवायच्या कशा असा प्रश्न केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना पडला आहे. दोन दिवसांपूर्वी या संदर्भात घेण्यात आलेल्या एका बैठकीत केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत. मतदारांचे अपूर्ण पत्ते हीच खरी डोकेदुखी असल्याचे केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने दुबार मतदारांचे नावे वगळण्याच्या सूचना केल्या असल्या तरी त्याची अंमलबजावणी अवघड आहे. (जोड आहे)