शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विस्कळीतपणा : नगराध्यक्ष, नगरसेवकांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट नांदगावला विकासकामांची ‘वाट’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 00:12 IST

नांदगाव : प्रशासनातल्या विस्कळीतपणामुळे शहरातील दैनंदिन व विकासकामांची वाट लागली असल्याची तक्र ार घेऊन नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या गटाने जिल्हाधिकाºयांची भेट घेतली.

नांदगाव : प्रशासनातल्या विस्कळीतपणामुळे शहरातील दैनंदिन व विकासकामांची वाट लागली असल्याची तक्र ार घेऊन नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या गटाने जिल्हाधिकाºयांची भेट घेतली. पूर्णवेळ अभियंता नाही, मुख्य अधिकारी यांच्यासह जबाबदारीच्या पदांवरील अनेक कर्मचारी कार्यालयीन कामकाजाच्या वेळा पाळत नाहीत, नगरसेवकांनी केलेल्या ठरावांची अंमलबजावणी होत नाही आदी तक्रारींचे निवारण करण्याचे मान्य करून राधाकृष्णन बी. यांनी येवला-मनमाड येथील अभियंत्याला अतिरिक्त पदभार देणे, कर्मचाºयांच्या हजेरीसाठी बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित करणे, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी नगर परिषद कार्यालयात अचानक पाठवून कामावर वेळेवर न येणाºया कर्मचाºयांची तपासणी करावी, अशा सूचना उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांना दिल्या.सहा महिन्यांपूर्वी नांदगाव येथे ग्रामविकास राज्यमंत्री दादाभाऊ भुसे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत समस्यांबाबत नगराध्यक्ष राजेश कवडे यांनी मुद्दा मांडला होता. भुसे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर कामकाजात सुधारणा झाली नाही. अखेर नगरसेवकांनी जिल्हाधिकाºयांकडे धाव घेतली. यावेळी माणिकपुंज धरणातून पिण्याच्या पाण्याच्या दहा कोटी रु पये खर्चाच्या नवीन योजनेचा प्रस्ताव माहितीसाठी राधाकृष्णन यांच्याकडे नगराध्यक्षांनी सादर केला. सिन्नर येथील अभियंता फुलारे यांच्याकडे नांदगावचा अतिरिक्त पदभार आठवड्यातून दोन दिवसांसाठी देण्यात आला असून, तेही येथे नियमित येत नाहीत. त्यामुळे अतिक्रमण, बांधकाम व विकासकामांच्या तांत्रिक मंजुरी, देखरेख आदी कामे ठप्प झाली आहेत. उपनगराध्यक्ष कामिनी साळवे, नगरसेवक महावीर पारख, अभिषेक सोनवणे, नितीन जाधव, वाल्मीक टिळेकर, सुनंदा पवार, मनीषा काकळीज, संगीता जगताप, आदी उपस्थित होत्या. मनमाड शहर जवळ असून, तालुक्यातील असल्याने तेथील अभियंत्यास नांदगावचा अतिरिक्त पदभार देण्याच्या मागणीला जिल्हाधिकारी यांनी नकार दिला. लेखापाल (२), स्थापत्य अभियंता (२) व संगणक अभियंता (१), पाणीपुरवठा अभियंता (१), सहा. कर निरीक्षक (१), सहा. मिळकत व्यवस्थापक (१), सहा. खरेदी पर्यवेक्षक (१), अग्निशमन पर्यवेक्षक (१), सहा. नगररचनाकार (१) ही पदे रिक्त आहेत. १२ पदांपैकी ११ पदे रिक्त आहेत. प्रशासनाने कार्यवाही न केलेल्या १८० ठरावांच्या प्रतींची फाइल जिल्हाधिकाºयांकडे सादर करण्यात आली.