शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
3
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
4
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
5
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
6
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
7
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
8
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
9
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
10
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
11
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
12
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
13
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
14
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
15
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
16
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
17
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
18
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
19
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
20
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!

2969 उमेदवारांवर अपात्रतेची संक्रांत

By admin | Updated: September 29, 2015 23:18 IST

ग्रामपंचायत निवडणूक : खर्च न दिल्याचा परिणाम

2969 उमेदवारांवर अपात्रतेची संक्रांतग्रामपंचायत निवडणूक : खर्च न दिल्याचा परिणामनाशिक : मोठ्या हौसेने ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक लढविल्यानंतर पदरी अपयश पडलेल्या निराश उमेदवारांकडून निवडणूक उलटूनही खर्च सादर न करण्यात आल्याने अशा २९६९ जणांना पाच वर्षांसाठी अपात्र ठरविण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, तसे झाल्यास या सर्वांना पुढच्या पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारी करणे मुश्किल होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. मार्च महिन्यात जिल्ह्णात ५९७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊन नवनिर्वाचित सदस्यांनी कारभारही सांभाळला; परंतु या निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांनी त्यांच्या निवडणूक प्रचारात केलेल्या खर्चाचा तपशील निवडणूक आटोपल्यानंतर (पान ५ वर)एक महिन्याच्या आत सादर करण्याचे बंधनकारक असताना तो सादर केला नाही. लोकप्रतिनिधी कायद्यान्वये खर्च सादर न करणाऱ्यांवर कारवाई करण्याची तरतूद असल्याने जिल्हा प्रशासनाने सर्व तहसीलदारांना पत्र पाठवून त्यांच्याकडून माहिती मागविली असता, त्यात जवळपास २९६९ निवडणूक लढविलेल्या उमेदवारांनी मुदतीत खर्च सादर न केल्याची बाब उघड झाली. त्यामुळे अशा सर्वांना पाच वर्षांसाठी अपात्र ठरविण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांतच यासंदर्भातील आदेश निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यापूर्वीही २०१४ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत खर्च सादर न करणाऱ्या १३७ जणांना जिल्हा प्रशासनाने पाच वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास बंदी घातली असून, त्यात कळवण (१८), निफाड (४७), मालेगाव (६६) व इगतपुरी (६) असा समावेश आहे.

 

  • टांगती तलवार

बारा तालुक्यांत निवडणूक खर्च सादर न करणाऱ्यांना अपात्र ठरविण्यात येणाऱ्यांमध्ये सर्वाधिक संख्या निफाडची (८५२ इतकी) आहे. त्या खालोखाल सिन्नर (५६७), मालेगाव (४८१), दिंडोरी (४३६), नाशिक (१६९), बागलाण (१६१), चांदवड (१६०), कळवण (९६), येवला (२३), देवळा (१७), त्र्यंबक (५) व इगतपुरी (२) जणांचा समावेश आहे. 

  • अजब कारणे

खर्च न सादर करणाऱ्या उमेदवारांनी त्याच्या समर्थनार्थ पुढे केलेले मुद्दे हास्यास्पद आहेत. काहींनी निवडणुकीत पराभूत झाल्याने नैराश्येच्या गर्तेत सापडल्याचे, तर काहींनी पराभवाचा धक्का सहन न झाल्याचे सांगितले. महिलांनी गर्भवतीचे कारण पुढे केले, तर काहींनी आजारपणाचे निमित्त सांगितले. अपात्र ठरलेल्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध विभागीय आयुक्तांकडे अपील करण्याची तरतूद असली तरी, त्यासाठी सबळ कारण पुराव्यानिशी स्पष्ट करणे आवश्यक आहे.