शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

मनसेच्या आंदोलनामुळे ‘राजगडा’वर वाद?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 00:40 IST

नाशिक : शहरात कोरोना संसर्ग वाढत असून, त्यातच आता राजकारणदेखील सुरू झाले आहे. मनसेच्या युवा नेत्यांनी महापौर सतीश कुलकर्णी यांना च्यवनप्राश भेट दिले खरे, परंतु भाजपपेक्षा मनसेच्या नेत्यांनाच हा विषय अधिक बोचला आहे. त्यामुळे शुक्रवारी (दि.१७) राजगडावर चांगलीच खडखड झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आता आंदोलने करायची किंवा नाही? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडल्याचे समजते.

नाशिक : शहरात कोरोना संसर्ग वाढत असून, त्यातच आता राजकारणदेखील सुरू झाले आहे. मनसेच्या युवा नेत्यांनी महापौर सतीश कुलकर्णी यांना च्यवनप्राश भेट दिले खरे, परंतु भाजपपेक्षा मनसेच्या नेत्यांनाच हा विषय अधिक बोचला आहे. त्यामुळे शुक्रवारी (दि.१७) राजगडावर चांगलीच खडखड झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आता आंदोलने करायची किंवा नाही? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडल्याचे समजते.शहरात कोरोना उद्रेक झाल्याने सध्या नागरिक भयभीत आहेत. महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने मनसेने महापौर सतीश कुलकर्णी यांना च्यवनप्राश भेट दिले. त्यामुळे आंदोलन चर्चेत ठरले असले तरी पक्षातील ज्येष्ठांना विशेषत: काही नगरसेवकांना ते रुचलेले नाही. शुक्रवारी (दि.१७) राजगडावर आलेल्या एका ज्येष्ठ नेत्याने तर आंदोलकांनाच अशी आंदोलने असतात का? वगैरे प्रश्न करून सुनावल्याचे समजते. दीड वर्षावर महापालिका निवडणुका आल्या असून, त्यामुळे आता पक्ष काहीतरी हालचाली सुरू करत असताना पक्षाचे नेते खो घालत असल्याने कार्यकर्ते नाराज झाल्याचे समजते.मनसे आंदोलनामुळेच मोठी झाली असली तरी गेल्या काही वर्षांत आंदोलने थंडावली आहेत. विशेषत: पक्षातील काही मोजके नेते पक्ष हाताळीत असल्याने कुठेही आंदोलन करताना नेत्यांना पूर्वकल्पना दिली नाही तर त्यांची नाराजी ओेढून घ्यावी लागते, अशी चर्चा आहे.------------------भविष्यातील निवडणुकीची चिंतामनसेचे नेते मुळातच आक्रमक राहिलेले नाहीत. नगरसेवकांचा तर आंदोलनात सहभाग नव्हताच परंतु त्यांची आंदोलनाची मानसिकता नसल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. अशीच अवस्था राहिल्यास दीड वर्षांनी होणाऱ्या मनपाच्या निवडणुकीत पक्ष कसा सामोरे जाणार? असा प्रश्न कार्यकर्ते करीत आहेत.---------------कोंडीची चर्चाअनेकांना पक्षात राहून काम करता येत नाही तर कोंडी होते. त्यातून काहीजण पक्षांतून बाहेरदेखील गेले आहेत. परंतु पक्षाची सूत्रे हाताळणाऱ्यांना त्याबद्दल काहीच वाटत नसल्याचे सांगितले जाते. विशेषत: महापालिका आणि स्मार्ट सिटीसंदर्भात आंदोलने करण्याबाबत संबंधित नेते फारसे अनुकूल नसतात, अशी खुली आम चर्चा पक्षाचे कार्यकर्तेच करतात.

टॅग्स :Nashikनाशिक