नाशिकरोड : महावितरण कंपनी कर्मचाºयांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात वीज भवन येथे महाराष्टÑ स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशनच्या वतीने मंगळवारी दुपारी निदर्शने करून निवेदन देण्यात आले.महाराष्टÑ स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशनच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विभाजनानंतर गठित झालेल्या महावितरण कंपनीचे अधिक विभाजन करून खासगीकरण व फ्रॅन्चाईसीकरण धोरण रद्द करावे, कर्मचारी, अभियंते, अधिकारी यांना पेन्शन योजना लागू करावी, कंत्राटी-आउटसोर्स व सुरक्षा रक्षकांना कायम करणे व त्यांच्या वेतनामध्ये वाढ करणे, समान काम समान वेतन निर्णयाची अंमलबजावणी करावी, मयत कामगारांच्या वारसांना सेवेत सामावून घेणे, आय.टी.आय बॅचेच सुरू कराव्या, सर्व रिक्त जागांवर कामगारांची भरती करणे, कामगारांचे कामाचे तास व जबाबदारी ठरवून देणे, कंत्राटीकरण धोरण रद्द करणे, विविध सहायक पदावर नेमणूकची पद्धत रद्द करून एक वर्षाच्या प्रशिक्षणानंतर सहायकांना कायम करणे, फोटो रिडिंग, बिल वाटप, वीज बिल कलेक्शन ही सर्व कामे कंत्राटी पद्धतीने न देता कंपनीमार्फत कायम कामगाराद्वारे करण्यात यावी, वीजचोरी, वीजपुरवठा खंडित करणे, थकबाकी वसुलीसाठी भरारी पथक नियुक्त करावे, अपघाताकरिता दोष नसताना कर्मचाºयांचे निलंबन, गुन्हा दाखल करणे या कारवाया बंद करा, अशा विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. निदर्शन आंदोलनात वर्कर्स फेडरेशनचे राज्य उपाध्यक्ष बी. डी. धनवटे, सुभाष काकड, दीपक गांगुर्डे, मनिष तळेकर, पंडित कुमावत, एस. आय. खान, दीपाली मोरे, दीपाली जाधव, प्राची पाटील आदी उपस्थित होते.
वीज महावितरण कर्मचाºयांची निदर्शने निवेदन : विविध प्रलंबित मागण्या तत्काळ पूर्ण करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 01:16 IST
महावितरण कंपनी कर्मचाºयांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात वीज भवन येथे महाराष्टÑ स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशनच्या वतीने मंगळवारी दुपारी निदर्शने करून निवेदन देण्यात आले.
वीज महावितरण कर्मचाºयांची निदर्शने निवेदन : विविध प्रलंबित मागण्या तत्काळ पूर्ण करण्याची मागणी
ठळक मुद्देखासगीकरण व फ्रॅन्चाईसीकरण धोरण रद्द करावेतनामध्ये वाढ करणेवसुलीसाठी भरारी पथक नियुक्त करावे