नाशिक : राज्य शासनाच्या नवीन बदली धोरणामुळे प्राथमिक शाळांच्या अवघड व सामान्य क्षेत्रात विभाजन करण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये तालुका बाह्य बदलीच्या भीतीने असंतोष पसरला आहे.राज्य शासनाच्या नवीन बदली धोरणात प्राथमिक शाळांच्या अवघड व सामान्यक्षेत्रात विभाजन करण्यात आले आहे. या गैरसोयीच्या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे, असे प्राथमिक शिक्षकांच्या संघटनेचे जिल्हा सरचिटणीस सुभाष अहिरे यांनी सांगितले. राज्य शासनाने प्राथमिक शिक्षकांच्या बदलीसाठी स्वतंत्र शासन निर्णय प्रसिद्ध केला. ग्रामविकास विभागाच्या धोरणातून शिक्षकांना वगळून हा नवीन शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. नवीन शासन निर्णयात पूर्वीच्या शासन निर्णयामधील बदलीसाठीचे तालुका व जिल्हा स्तर रद्द करण्यात आले आहे. या निर्णयानुसार आता सर्व बदल्या जिल्हास्तरावर होणार आहेत. प्रत्येक तालुक्याच्या दळणवळणाच्या दृष्टीने गैरसोयीच्या शाळा अवघड क्षेत्रामध्ये अन्य शाळा सर्वसाधारण क्षेत्रामध्ये समाविष्ट करण्यास सुचविण्यात आले आहे.
बदलीच्या धोरणाविरोधात शिक्षकांमध्ये असंतोष
By admin | Updated: March 14, 2017 00:28 IST