यासंदर्भात मनसेचे कार्यकर्ते संदीप भंवर यांनी उच्च न्यायलयात जनहित याचिका दाखल केली हेाती. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात दाखल याचिकेवर उच्च न्यायालयाने कंपनीला पंधरा हजार रूपयांसंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कंपनीने प्रतिज्ञापत्र सादर केले, त्यात उमेदवारांकडून घेण्यात येणारे पंधरा हजार रूपये ही अनामत रक्कम आहे. या रकमेतून कामगारांना गणवेश, जीपीएस, झाडू, स्वच्छता साधने आणि व्हील बरोज देण्यात येणार आहे. कोणी कामगाराने नोकरी सोडली तर दिलेल्या वस्तु परत घेऊन त्यांची सुरक्षा अनामत रक्कम परत घेण्यात येईल असे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे बुधवारी (दि.१७) उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली. वॉटरग्रेसच्या वतीने ॲड. रामपाल कोहली, मिलींद साठे यांनी काम बघितले.
आऊटसोर्सिंग ठेक्यातील अनामत प्रकरणी याचिका निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:39 IST