शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक प्रतिमा जपावी

By admin | Updated: November 28, 2015 22:53 IST

अनिल सिंह : कायदेविषयक चर्चा सत्रात वकिलांना आवाहन

नाशिक : भारतीय स्वातंत्र्यलढा, राज्यघटनेची निर्मिती यामध्ये वकिलांचे मोठे योगदान असून, आजही संसद सदस्यांमध्ये कायद्याचे शिक्षण घेतलेल्या खासदारांची संख्या अधिक आहे़ वकिलांकडे समाज एका वेगळ्या दृष्टिकोनातून व अपेक्षेने पाहत असतो़ त्यामुळे वकिलांनीही केवळ व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता सामाजिक जबाबदारी व प्रतिमा जोपासणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केंद्र शासनाचे अतिरिक्त महाधिवक्ता अनिल सिंग यांनी केले़ महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल आणि नाशिक बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जुना गंगापूर नाक्याजवळील चोपडा बॅन्क्वेट हॉलमध्ये आयोजित दोन दिवसीय कायदेशीर चर्चासत्र या कार्यक्रमात ‘प्रोफेशनल राईट अ‍ॅण्ड रिस्पॉन्सबिलिटी आॅफ अ‍ॅडव्होकेट््स अ‍ॅण्ड रिसेण्ट लॉ’ या विषयावरील तज्ज्ञांच्या चर्चासत्रानंतर ते बोलत होते़ सिंग पुढे म्हणाले की, वकील व डॉक्टर या दोन घटकांकडे समाज मार्गदर्शक म्हणून पाहतो़ त्यामुळे व्यवसायाबरोबरच समाजाच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारीही वकिलांची असल्याचे सिंग यांनी सांगितले़या चर्चासत्रात सहभागी झालेले अ‍ॅड़ राजीव पाटील, अ‍ॅड़ श्रीधर माने, अ‍ॅड़ एऩ जी़ गायकवाड, अ‍ॅड़ एम़ वाय. काळे, अ‍ॅड़ विठ्ठल कोंडे - देशमुख यांनीही या विषयावर आपली मते मांडली़ त्यामध्ये वकिलांवर दाखल होणाऱ्या फौजदारी गुन्ह्यांमुळे वकिलांच्या प्रतिमेस धक्का पोहोचत असल्याचे सांगितले़ त्यामुळे वकिलांनी ओळख देताना, नोटरी करताना काळजी घेण्याची आवश्यकता आहे़ डॉक्टरांप्रमाणेच वकिलांनाही संरक्षण मिळावे यासाठी न्यायालयात लवकरच याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहितीही या चर्चेतून समोर आली़या कायदेविषयक चर्चासत्राचे उद्घाटन कोपरगावचे जिल्हा व सत्र न्यायाधीश ए़ पी़ रघुवंशी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले़ यानंतर ‘कॉन्ट्राडिक्शन अ‍ॅण्ड ओमिशन’ या विषयावर न्यायाधीश रघुवंशी यांनी मार्गदर्शन केले़ दुपारच्या सत्रात ‘स्कील्स अ‍ॅण्ड ड्राफ्टिंग अ‍ॅण्ड अर्ग्युर्इंग बेल मॅटर्स’ या विषयावर झालेल्या चर्चासत्रामध्ये अ‍ॅड़ गजानन चव्हाण, अ‍ॅड़ मिलिंद थोबाडे, अ‍ॅड़ बळवंत जाधव, अ‍ॅड़ अविनाश भिडे यांचा समावेश होता़ यानंतर ‘इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्स अ‍ॅण्ड रिक्वायमेंट आॅफ प्रुफ’ या विषयावर चर्चासत्रात अ‍ॅड़ बी़ के़ गांधी यांनी मार्गदर्शन केले़ (प्रतिनिधी)