शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

स्पा सेंटरमध्ये सुरू असलेला देहविक्रीचा अड्डा उद्ध्वस्त

By admin | Updated: May 25, 2017 01:55 IST

नाशिक : उच्चभ्रूंची वस्ती असलेल्या कॉलेजरोड परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या देहविक्री व्यवसायावर बुधवारी (दि़ २४) पोलिसांनी छापा टाकला़

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : उच्चभ्रूंची वस्ती असलेल्या कॉलेजरोड परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या देहविक्री व्यवसायावर बुधवारी (दि़ २४) पोलिसांनी छापा टाकला़ यां ठिकाणाहून आठ मुली व पाच मुले अशा १३ संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ विशेष म्हणजे यापूर्वीदेखील या स्पा सेंटरवर पोलिसांनी कारवाई केली होती; मात्र पुन्हा या स्पा सेेंटरच्याआड देहविक्री सुरू झाल्याने परिसरात चर्चेचा विषय आहे़  हॉलमार्क चौकातील एस. के. ओपन मॉलमध्ये हे स्पा सेंटर सुरू होते़ पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ, गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देवीकर यांनी ‘एक्झोटिक’ स्पा सेंटरवर छापा टाकला़ या सेंटरमधून सात मुली व पाच मुलांना ताब्यात घेण्यात आले़ तर स्पा सेंटरचा मालक संशयित परेश सुराणा हा फरार झाला असून, त्याच्यावर पिटा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ शहरातील कॉलेजरोड परिसर हायप्रोफाइल म्हणून ओळखला जातो. या परिसरात ठिकाणी विविध मॉल्स, सिनेमागृह, महाविद्यालये आहेत. या परिसरात काही दिवसांपासून मोठ्या संख्येने स्पा सेंटर सुरू आहेत. कॉलेजरोड, गंगापूररोड, विसे मळा, येवलेकर मळा आदी भागांमध्ये स्पा सेंटरचे जाळे वाढत असून, यामध्ये देहविक्रय केला जात असल्याचे पोलीस कारवाईमधून अनेकदा समोर आले आहे़ मात्र, हे स्पा सेंटर पुन्हा सुरू होत असल्याने यावर कोणाची कृपादृष्टी आहे त्याचा शोध घेणे आवश्यक असल्याचे नागरिकांनी सांगितले़ दरम्यान, कॉलेजरोड परिसरात अनेक अनैतिक व्यवसाय सुरू असल्याने कारवाईची मागणी होत आहे.