शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांमध्ये बदलीच्या धसक्याने अस्वस्थता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 19:04 IST

यंदा निवडणूक आयोगाने निवडणुकीशी संबंधित असलेल्या खात्याच्या अधिका-यांच्या बदल्यांचे धोरण स्वीकारले असून, त्यात प्रामुख्याने महसूल व पोलीस खात्याचा समावेश आहे. साधारणत: मार्च महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होऊन निवडणूक कार्यक्रमाला प्रत्यक्ष सुरुवात होणार

ठळक मुद्देसोयीसाठी धावाधाव : मंत्रालयात प्रस्ताव रवाना

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : आगामी लोकसभा निवडणूक निष्पक्ष व पारदर्शी पार पडावी, यासाठी निवडणूक आयोगाने वर्षानुवर्षे एकाच जिल्ह्यात कार्यरत असलेल्या सर्व अधिका-यांच्या बदल्या करण्याचे धोरण स्वीकारल्यामुळे महसूल खात्याच्या अधिका-यांमध्ये बदलीच्या धसक्याने अस्वस्थता निर्माण झाली आहे. यात तहसीलदार, उपजिल्हाधिकारी संवर्गाचा समावेश असल्यामुळे अलीकडच्या काळात स्व जिल्ह्यात परतलेल्या अधिकाºयांनी पुन्हा सोयीसाठी बदल्या करून घेण्यासाठी धावाधाव सुरू केली असून, दुसरीकडे बदलीपात्र अधिकाºयांच्या संपूर्ण माहितीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांनी मंत्रालयात सादर केला आहे.यंदा निवडणूक आयोगाने निवडणुकीशी संबंधित असलेल्या खात्याच्या अधिका-यांच्या बदल्यांचे धोरण स्वीकारले असून, त्यात प्रामुख्याने महसूल व पोलीस खात्याचा समावेश आहे. साधारणत: मार्च महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होऊन निवडणूक कार्यक्रमाला प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याने तत्पूर्वीच मोठ्या प्रमाणात खांदेपालट होणार आहे. नाशिक विभागात प्रामुख्याने ४६ उपजिल्हाधिकारी व ६० तहसीलदारांच्या बदल्या होतील, असा अंदाज असल्याने त्याबाबतची माहिती विभागीय आयुक्तांनी प्रत्येक जिल्हाधिका-यांकडून अधिका-यांची माहिती मागविली आहे. त्यात प्रामुख्याने स्वजिल्ह्यातील रहिवासी असलेले अधिकारी, एकाच पदावर कार्यरत असलेले व ३१ मे २०१९ रोजी तीन वर्ष पूर्ण होत असलेले, जिल्ह्यात गेल्या चार वर्षांतील तीन वर्षे कार्यरत असलेले, गेल्या वर्षभरात लोकसभा व विधानसभा निवडणूक पार पाडलेले अधिकारी तसेच ज्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत अशा अधिका-यांचा समावेश आहे. त्यामुळे बदली होणा-या अधिका-यांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली असून, याबाबतची सारी माहिती घेऊन विभागीय आयुक्तालयाने अधिका-यांच्या बदल्यांचे प्रस्ताव तयार करून ते मंत्रालयात रवाना केले आहेत. मात्र निवडणुकीच्या काळात गैरसोयीच्या बदल्या होण्याच्या धसक्याने अधिका-यांमध्ये अवस्थता निर्माण झाली आहे. काही अधिका-यांच्या पाल्यांच्या ऐन परीक्षांच्या कालावधीत बदल्यांमुळे स्थलांतराची वेळ आल्याने अधिका-यांची धावपळ उडाली आहे. त्यामुळे सोयीच्या ठिकाणी बदलून जाण्यासाठी लगतच्या जिल्ह्यांमध्ये रिक्त असलेल्या अथवा होऊ पाहणा-या जागांची माहिती गोळा केली जात असून, अशा जागांवर बदली व्हावी यासाठी धावाधाव केली जात आहे. साधारणत: फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बदल्यांचे आदेश निघतील, असा अंदाज व्यक्त केला जात असून, तत्पूर्वी संपूर्ण प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय