शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेचा अपेक्षाभंग : मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक

By admin | Updated: May 28, 2017 21:51 IST

शहर दत्तक घेणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून भरघोस अशा आर्थिक मदतीची आशा बाळगून असलेल्या नाशिक महापालिकेचा अपेक्षाभंग

नाशिक : शहर दत्तक घेणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून भरघोस अशा आर्थिक मदतीची आशा बाळगून असलेल्या नाशिक महापालिकेचा अपेक्षाभंग झाला. महापालिकेत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कोणतीही ठोस घोषणा झाली नाही, उलट महापालिकेने आपल्या गरजा आपणच कशा भागविल्या पाहिजे, याबाबत काही उदाहरणांच्या माध्यमातून सल्ला दिला गेला. दरम्यान, महापालिकेने तयार केलेल्या काही कार्ययोजनांमध्ये महापालिका व राज्य सरकारचा हिस्सा जाऊन जो काही निधी लागेल, तो उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. मात्र, नोकरभरतीचा प्रस्ताव फेटाळून लावत त्यांनी केवळ तांत्रिक पदांनाच मान्यता देण्याचे स्पष्ट केले. नाशिक महापालिकेतील स्थायी समितीच्या सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी महापालिकेकडून आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी विविध प्रकल्पांसाठी २१७३ कोटी रुपयांच्या आराखड्याचे सादरीकरण केले. यावेळी कॉँग्रेस गटनेता शाहू खैरे, शिवसेना गटनेता विलास शिंदे व राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार यांनी काही मुद्दे मांडले. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, महापालिकेला घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, पिण्याचे पाणी आणि वाहतूक व्यवस्था या चार बाबींवर लक्ष केंद्रित करण्यास सांगण्यात आले आहे. बैठकीत गोदावरी संवर्धनावरही चर्चा झालेली आहे.