शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
3
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
4
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
5
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
6
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
7
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
8
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
9
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
10
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
11
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
12
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
13
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
14
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
15
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
16
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
17
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
18
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
19
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
20
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी

संचालक बरखास्ती : १४ ला सुनावणी

By admin | Updated: June 28, 2017 00:51 IST

नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांना बरखास्तीच्या नोटिसां-प्रकरणातील सुनावणी १४ जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांना बरखास्तीच्या नोटिसां-प्रकरणातील सुनावणी १४ जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. बाजार समितीच्या १८ संचालकांनी सुनावणी-दरम्यान त्यांचा लेखी खुलासा जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांच्याकडे सादर केल्यानंतर या प्रकरणात मंगळवारी (दि. २७) सुनावणी होणार  होती. परंतु, आता ही सुनावणी १४ जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात  आल्याने बाजार समिती संचालकांनाही १४ जुलैपर्यंत अभय  मिळाले आहे.  दरम्यान, १४ जुलैपर्यंत बाजार समितीत सत्ताबदल घडवून आणण्यासाठी इतर गट सक्रिय झाल्याचे वृत्त असून, त्यासाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे.  बाजार समिती संचालकांनी बरखास्तीच्या नोटिसींना मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देत याचिका दाखल केली असून, मुंबई उच्च न्यायालयाने जिल्हा उपनिबंधकांना बाजार समितीबाबत घेतलेल्या कोणत्याही निर्णयाची अंमलबजावणी ६ जुलैपर्यंत करू नये, असे स्थगिती आदेश दिल्याचे बाजार समितीच्या संचालकांनी सांगितले. त्यामुळे २७ जून रोजी होणाऱ्या सुनावणीबाबत औपचारिकताच उरली होती.  १९ जून रोजी सुनावणी न झाल्याने ती सुनावणी २१ जून रोजी ठेवण्यात आली होती. बुधवारी या सुनावणीसाठी बाजार समितीचे प्रभारी सभापती श्याम गावित, उपसभापती शंकर धनवटे यांच्यासह सर्व १८ संचालकांनी त्यांचे म्हणणे लेखी स्वरूपात सादर केले. बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे यांच्या वतीने त्यांच्या प्रतिनिधीने त्यांचे म्हणणे सादर केले. त्यावर पुढील सुनावणी आता २७ जून रोजी होणार होती. परतु बुधवारी ही सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याने तोपर्यंत तरी संचालकांना अभय मिळाले आहे.