शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

उमराणे बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 00:58 IST

उमराणे : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले असून, पणन मंडळाच्या अभिप्रायावरून जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे यांनी ही कारवाई केली. सहायक निबंधक एस.पी. कांदळकर यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्देपणन मंडळ : उपनिबंधकांची कारवाई

उमराणे : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले असून, पणन मंडळाच्या अभिप्रायावरून जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे यांनी ही कारवाई केली. सहायक निबंधक एस.पी. कांदळकर यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.उमराणे स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन झाल्यानंतर लोकशाही पद्धतीने निवडणूक होऊन विलास देवरे व खंडू देवरे यांच्या गटाची सत्ता स्थापन झाली होती. बाजार समितीच्या प्रथम सभापतिपदाचा मान विलास देवरे यांना मिळाला होता. देवरे यांनी सभापतिपदाचा राजीनामा दिल्याने राजेंद्र देवरे यांची सभापतिपदी वर्णी लागली होती. बाजार समितीच्या दैनंदिन व्यवहाराबाबत विरोधी संचालक प्रशांत देवरे यांनी शेतकरी हिताची बाजू लावत शासनाकडे शेतकऱ्यांचे शेतमाल विक्र ीची थकीत रक्कम, बाजार फी, देखरेख फी, परवाना नूतनीकरणविषयी लेखी तक्रार दिली होती. शेतकºयांनी पालकमंत्री, जिल्हाधिकारी, लोकशाही दिन, शासन पोर्टलमार्फत तक्रारी दाखल केल्या होत्या. जिल्हा उपनिबंधक यांनी बाजार समिती प्रशासनाकडे याबाबत लेखी पत्राद्वारे विचारणा करून अहवाल मागवला होता. दोन-तीन वेळा कामकाज सुधारण्यासाठी बाजार समितीला संधी देण्यात आली होती. संचालक मंडळ, सचिव व प्रशांत देवरे यांच्या लेखी खुलाशानंतर जिल्हा उपनिबंधक यांनी कर्तव्य, अधिकार व जबाबदारी याबाबत असमर्थतेचा ठपका ठेवत संचालक मंडळ बरखास्त करण्याची कारवाई केली. संचालक प्रशांत देवरे यांनी वेळोवेळी लेखी तक्र ार व विरोध नोंदविल्याबद्दल आणि शिवाजी ठाकरे मयत झाल्याने त्यांना दोषी ठरविले नाही. उर्वरित संचालक मंडळासह सचिव यांना दोषी ठरवत संचालक मंडळ बरखास्त केले आहे.४संचालक मंडळ बरखास्तीनंतर प्रशासक कांदळकर यांच्याकडे बाजार समितीचा कार्यभार देण्यात आला आहे. सचिव व उपसचिव अचानक रजेवर गेल्याने प्रशासकांना कार्यभार घेता आला नाही. प्रशासकांनी दिवसभर बॅँक कामाविषयी वेळ दिला. दरम्यान, बुधवारी (दि.१८) बाजार समितीचे नवनियुक्त प्रशासक एस.पी. कांदळकर हे रितसर कार्यभार सांभाळणार असून, संचालक मंडळ आपले पद वाचविण्यासाठी न्यायालयात धाव घेतात की काय, याकडे बाजार समितीचे कार्यक्षेत्र असलेल्या उमराणेसह परिसरातील आठ गावांतील जनतेचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती