शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

भ्रमनिरास : शाळांमध्ये अपेक्षित उपक्रम राबविण्याकडे सर्वांचेच दुर्लक्ष ‘विद्यार्थी दिन’ निव्वळ औपचारिकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 01:15 IST

७ नोव्हेंबर १९०० या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रथम शाळेत प्रवेश घेतला तो दिवस राज्यात ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा करण्यात यावा, असे आदेश शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने काढले होते.

ठळक मुद्दे‘विद्यार्थी दिवस’ साजरा करण्याची निव्वळ औपचारिकताउपक्रम न राबविता केवळ शिक्षकांची भाषणे इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडून कार्यक्रम नाही

नाशिक : ७ नोव्हेंबर १९०० या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रथम शाळेत प्रवेश घेतला तो दिवस राज्यात ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा करण्यात यावा, असे आदेश शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने काढले होते. त्यानुसार सदर दिवस साजरा करण्यात आलाही मात्र जे उपक्रम राबविणे अपेक्षित होते त्याकडे शाळांनी दुर्लक्ष केल्यामुळे ‘विद्यार्थी दिवस’ साजरा करण्याची निव्वळ औपचारिकता शाळांनी पूर्ण केली असेच काहीसे चित्र शहरात दिसून आले.महाराष्टÑ शासनाने ७ नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करावा, असे आदेश शाळांना २७ आॅक्टोबर रोजीच दिले होते. देशाचे संविधान निर्माते असलेल्या डॉ. आंबेडकर यांच्या शालेय जीवनाविषयी विद्यार्थ्यांना माहिती असावी आणि त्यांचे जीवनमूल्ये विद्यार्थ्यांना कळावित यासाठी शासनाने विद्यार्थी दिवस साजरा करण्याचे आदेश शाळांना दिले होते. प्रत्येक विद्यार्थी हा देशाचे भविष्य आहे. त्यामुळे आदर्श विद्यार्थी निर्माण होण्यासाठी शिक्षण हेच एकमेव साधन आहे आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या कठोर परिश्रमाची जाण सर्व विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी डॉ. आंबेडकरांचा शाळा प्रवेशाच्या दिवसाचे औचित्य साधण्यात आले आहे. या दिवशी सर्व शाळांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विविध पैलंूवर निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, काव्यवाचन आदी साहित्यिक, सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करावे, अशा सूचना शासनाने आॅक्टोबरमध्येच सर्व शाळांना दिलेल्या होत्या. असे असतानाही शाळांमध्ये अपेक्षित उपक्रम न राबविता केवळ शिक्षकांची भाषणे आणि प्रतिमा पूजन इतकेच कार्यक्रम घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. यास काही शाळा अपवाद नक्कीच आहेत. परंतु सध्या सुरू असलेल्या सहामाही परीक्षा आणि स्काउट गाइड शिबिरांमुळे शाळांकडून विद्यार्थी दिनाची फारशी दखलच घेण्यात आली नसल्यामुळे केवळ औपचारिकता म्हणून सदर दिवस साजरा करण्यात आला असल्याचे बोलले जात आहे. मराठी माध्यमांच्या शाळांनी निदान प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विद्यार्थी दिनाचा सन्मान तरी राखला आहे. मात्र इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडून अपेक्षित कार्यक्रम राबविण्यात आले नाहीच शिवाय एकाच सत्रात अभिवादन कार्यक्रम करण्यात आल्याचीही चर्चा आहे.