शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

ढोलबारे परिसरात बिबट्याची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 01:00 IST

वीरगाव : येथून जवळच असलेल्या आव्हाटी, ढोलबारे परिसरातील कुंभाऱ्या डोंगर परिसरात बिबट्याचे कायम वास्तव्य असून, तो आता नागरी वस्तीत येऊन हैदोस घालत आहे. पांडे वस्तीवरील एका गायीचा फडशा पाडल्याने बिबट्याची दहशत वाढली आहे. याठिकाणी मेंढपाळांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य असल्याने वनविभागाकडून त्वरित पिंजरा लावण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ठळक मुद्देवनविभागाकडून त्वरित पिंजरा लावण्यात यावा, अशी मागणी

वीरगाव : येथून जवळच असलेल्या आव्हाटी, ढोलबारे परिसरातील कुंभाऱ्या डोंगर परिसरात बिबट्याचे कायम वास्तव्य असून, तो आता नागरी वस्तीत येऊन हैदोस घालत आहे. पांडे वस्तीवरील एका गायीचा फडशा पाडल्याने बिबट्याची दहशत वाढली आहे. याठिकाणी मेंढपाळांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य असल्याने वनविभागाकडून त्वरित पिंजरा लावण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.वीरगाव परिसराला लागून असलेल्या आव्हाटी, ढोलबारे या डोंगररांगेत कुंभाऱ्या डोंगर असून, याठिकाणी बिबट्याचा कायमचा मुक्काम आहे. या ठिकाणी बºयापैकी जंगल परिसर असल्याने बिबट्या नागरी परिसरात येत नाही; परंतु यंदा दुष्काळी स्थिती असल्याने भक्ष्य व पाण्याच्या शोधात बिबट्या थेट नागरी वस्तीत येऊ लागला आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून एका बिबट्याने ढोलबारे परिसरात भटक्या व पाळीव प्राण्यांचा फडशा पाडला आहे. यामुळे सर्वत्र दहशतीचे वातावरण पसरले आहे.शनिवारी (दि. २) पहाटे पांडे वस्तीवरील मनीषा पांडे यांच्या मालकीच्या गाईवर हल्ला करत ठार केले. याबाबत वनविभागाला माहिती दिल्यानंतर वनअधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या भागात मेंढपाळांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात असून, पशुधनासह मेंढपाळ बांधव वास्तव्याला आहेत. बिबट्याने वस्तीवरील पाळीव प्राण्यांची शिकार करण्याचा सपाटा लावल्याने सर्वत्र दहशत पसरली आहे. त्यामुळे परिसरात तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी ग्रामस्थांनी केली आहे.