जायखेडा : येथे डेंग्यूसदृश अनेक रुग्ण आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शासकीय व खासगी रूग्णालयांमध्ये सर्व वयोगटातील रूग्ण मोठ्या संख्येने उपचार घेत आहेत.चार-पाच दिवसांपासून गावात थंडी, ताप, पेशी कमी होणे, अंगदुखी, सर्दी, खोकला आदि आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. बहुसंख्य रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात व खासगी रुग्णालयात उपचार घेत असून, अनेकांना तातडीच्या उपचारासाठी मालेगाव येथील खासगी रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, आरोग्य यंत्रणा व ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परिसर स्वच्छ ठेवावा असे सांगण्यात आले.पाच-सहा दिवसांपूर्वी जायखेडा येथील काजल अशोक जगताप (१२) या अल्पवयीन मुलीचा उपचारादरम्यान तापाने मृत्यू झाला. जायखेडा येथे तिच्यावर उपचार करण्यात आले. पुढील उपचारासाठी तिला मालेगाव आणि नंतर नाशिक येथे पाठविण्यात आले होते. थंडी-तापसारख्या आजाराविषयी भीती निर्माण झाली आहे. (वार्ताहर)
जायखेडा येथे डेंग्यूसदृश आजाराचे रु ग्ण
By admin | Updated: September 13, 2016 00:49 IST