शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याला रोगांचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 00:27 IST

ढगाळ हवामान, पहाटेचे धुके व दवबिंदूंमुळे कांदा पिकावर मावा, मर व करपा रोगांनी थैमान घातल्याने येवला तालुक्यातील हजारो हेक्टरवरील कांदा पीक धोक्यात आले आहे. पीक वाचविण्यासाठी महागडी औषधे फवारणी करण्यात शेतकरी व्यस्त असून, उत्पादन खर्चात वाढ होत असल्याने हमीभावाची चिंता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे.

ठळक मुद्देपाटोदा : औषधांची फवारणी

पाटोदा : ढगाळ हवामान, पहाटेचे धुके व दवबिंदूंमुळे कांदा पिकावर मावा, मर व करपा रोगांनी थैमान घातल्याने येवला तालुक्यातील हजारो हेक्टरवरील कांदा पीक धोक्यात आले आहे. पीक वाचविण्यासाठी महागडी औषधे फवारणी करण्यात शेतकरी व्यस्त असून, उत्पादन खर्चात वाढ होत असल्याने हमीभावाची चिंता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे.येवला तालुक्यात नकदी पीक म्हणून कांदा पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. यावर्षी हजारो एकर क्षेत्रावर लागवड केलेल्या पोळ कांद्याला परतीच्या पावसाचा फटका बसल्याने शेतकरीवर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. या संकटातून सावरत काही शेतकऱ्यांनी उशिराने कांदा रोपे टाकली, तर काहींनी उपलब्ध होईल तेथून मिळेल त्या भावात रोप विकत घेऊन हजारो हेक्टर क्षेत्रात कांदा लागवड केली. यासाठी एकरी सुमारे एक लाख रु पयांपेक्षा जास्त खर्च आला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठा बदल होत असून, पहाटेच्या वेळेस दाट धुके व दवबिंदू पडत आहे, तर दिवसभर ढगाळ वातावरण राहत असल्याने कांदा पिकावर मर, मावा व करपा रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. लागवड केलेला कांदा पोसण्यास सुरू झालेली असतानाच वातावरणात बदल झाल्याने कांदा पिवळा पडू लागला आहे. तसेच वाढही खुंटली आहे. महागड्या औषधांची फवारणी करूनही रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.यावर्षी नाशिक जिल्ह्यात शेतकरीवर्गाने कोट्यवधी रु पये खर्च करून लाल, पोळ कांद्याची सुमारे ६८ हजार २२६ हेक्टर क्षेत्रावर लागवड केली होती. मात्र ऐन मोसमात आॅक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने मुक्काम ठोकल्याने सुमारे ५४ हजार ४०७ हेक्टर क्षेत्रावरील कांदा बाधित झाला, तर शिल्लक १३ हजार ८१८ हेक्टर क्षेत्रावरील पीक विविध रोगांचा बळी पडले.उत्पादनात मोठी घट आली आहे. परिणामी कांदा दराने उच्चांकी गाठली आहे. मात्र शेतकºयांकडे आता कांदाच शिल्लक नसल्याने या दरवाढीचा फायदा होत नसल्याची भावना शेतकºयांनी व्यक्त आहे.गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे कांदा पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने महागड्या औषधांची फवारणी केली. मात्र रोग नियंत्रणात येत नसल्याने मोठे आर्थिक नुकसान होत आहे.- दत्तात्रय नाईकवाडे, कांदा उत्पादक, पाटोदा

 

टॅग्स :agricultureशेतीonionकांदा