शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

घटत्या उत्पन्नाची ‘चर्चा तर होणारच...’

By admin | Updated: January 29, 2017 00:01 IST

अनुदानावर अवलंबित्व : कर्जबाजारी मनपा, जीएसटीचे आव्हान

नाशिक : जकात हटवून एलबीटी लागू करण्यात आला. त्यानंतर पन्नास कोटी रुपयांच्या आतील उलाढालीवरील एलबीटी रद्द करण्यात आला आणि शासन अनुदानावर महापालिकेचा गाडा हाकण्यास सुरुवात झाली. शासनाच्या बदलत्या धोरणांचा महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला. आजमितीला नाशिक महापालिकेचे घटत चाललेले उत्पन्न ही चिंताजनक बाब बनली आहेच शिवाय कर्ज काढून महापालिकेला सिंहस्थातील कामे करावी लागलेली आहेत. आता एलबीटी जाऊन जीएसटी येऊ घातला आहे आणि त्यामुळे उत्पन्नात आणखी घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटत्या उत्पन्नामुळे शहरातील विकासकामांवर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे, महापालिका निवडणुकीत या घटत्या उत्पन्नाची चर्चा तर होणारच! महापालिकेला जकात वसुलीच्या माध्यमातून बऱ्यापैकी उत्पन्न पदरात पडत होते. परंतु, जकात रद्द करण्याचा निर्णय झाला आणि त्याऐवजी एलबीटी वसुली सुरू झाली. महापालिकेने एलबीटी वसुलीतही बऱ्यापैकी उत्पन्नाचा आलेख स्थिर ठेवला. परंतु, राज्य शासनाने ५० कोटी रुपयांच्या आतील उलाढालीवरील एलबीटी रद्द करत केवळ ५० कोटी रुपयांच्या वरील उलाढालीवरील एलबीटी वसुलीला परवानगी दिली.  रद्द केलेल्या एलबीटीच्या उत्पन्नाऐवजी शासनाने महापालिकेला दरमहा सुमारे ३१ कोटी रुपयांचे अनुदान देण्यास सुरुवात केली आणि हे अनुदान आजतागायत सुरू आहे. महापालिकेच्या खजिन्यात डिसेंबर २०१६ अखेर ६५० कोटी रुपयेएलबीटी जमा झाला होता. महापालिकेने चालू आर्थिक वर्षात ८१० कोटी रुपये एलबीटी वसुलीचे उद्दिष्ट ठेवले आहे. सन २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी महापालिका आयुक्तांनी १३५७.९६ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते. त्यात स्थायी समितीने ३८० कोटी रुपयांची वाढ केल्याने ते १७३७.९६ कोटींवर जाऊन पोहोचले होते. मात्र, उत्पनाची जमा बाजू लक्षात घेता महासभेने त्यात केवळ २३.५५ कोटी रुपयांची भर घालत ते १७६१.५१ कोटींवर नेऊन ठेवले. सद्यस्थितीत महापालिकेच्या एलबीटी वसुलीचा वेग, घरपट्टी व पाणीपट्टी वसुली पाहता उत्पन्न ११०० कोटींच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच, यंदा आयुक्तांचेही अंदाजपत्रक पूर्णत्वाला जाईल की नाही, याची खात्री नाही. त्यातच केंद्र सरकारकडून आता जुलै २०१७ पासून जीएसटी लागू केली जाण्याची शक्यता आहे.  जीएसटीमुळे उत्पन्नावर आणखी परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महापालिकेत घटत चाललेल्या उत्पन्नामुळे शहरातील विकासकामांवरही परिणाम होत आहे. त्याचे पडसाद महापालिका निवडणुकीतील प्रचारात उमटण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)