सिन्नर : येथील संजीवनीनगरमधील उद्यानात कामगार शक्ती फाउंडेशनचा मेळावा उत्साहात संपन्न झाला. यावेळी फाउंडेशनच्या उपक्रमांसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.फाउंडेशनचे संस्थापक अनिल सरवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस व्यासपीठावर नगराध्यक्ष आश्विनी देशमुख, विडी कामगार नेते नारायण आडणे, महाराष्ट्र वीज कामगार संघाचे सुभाष गोसावी, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक कामगार संघटनेचे दत्ता उगले, घरेलू महिला कामगार संघटनेचे संजय गंगावणे, महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेचे प्रमोद घोलप आदि मान्यवर उपस्थित होते.आदर्श समाज घडविण्यासाठी प्रत्येकाने सामाजिक कार्यात पुढाकार घ्यावा, सामाजिक कार्यातूनच समाजाला आपली ओळख करून द्यावी, असे आवाहन कामगार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सरवार यांनी यावेळी केले. या प्रसंगी उद्योजक कोमल धांड, मंगेश परदेशी, किरण भावसार यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कामगार शक्ती फाउंडेशनच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. मेळाव्यास फाउंडेशनचे माणिक नवले, नवनाथ सोबले, किरण भोसले, रवींद्र गिरी, संतोष नवले, मधुकर सोनवणे, संजय सरवार, मगन साळवे, संजय कडलग, आकाश पाटील, नवनाथ सरवार, बाळासाहेब घोटेकर, उल्हास सरवार, नितीन नाईकवाडी, पप्पू उसरे आदिंसह महिला गृहउद्योगाच्या सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. किरण भोसले यांनी सूत्रसंचालन केले. रवींद्र गिरी यांनी आभार मानले. (वार्ताहर)
कामगार शक्तीच्या मेळाव्यात विविध विषयांवर चर्चा
By admin | Updated: January 3, 2016 23:05 IST