शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्हा परिषदेच्या सदस्यांमध्येही पक्षांतराची चर्चा

By श्याम बागुल | Updated: July 30, 2019 18:31 IST

जिल्हा परिषदेचे सदस्य असताना विधानसभा निवडणूक लढवून विजयी झालेल्यांची प्रमाण जिल्ह्यात अधिक आहे. किंबहुना जिल्हा परिषदेनेच विधीमंडळाचे कवाडे खुले करून दिले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या किमान दहा ते पंधरा टक्के सदस्यांना प्रत्येक विधानसभा निवडणुकीचे वेध लागतात.

ठळक मुद्देयुतीवर भवितव्य अवलंबून : एकमेकांविषयी संशयी भूमिकापक्षांतर करून उमेदवारी मिळेलच कोणतीही शाश्वती आजच्या घडीला कोणी देवू शकत नाही.

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र पक्षांतराचे वारे वाहू लागल्याने नाशिक जिल्ह्यातही भाजप वगळता सर्वपक्षीयांमध्ये पक्षांतराची जोरदार चर्चा होवू लागली असून, विशेष करून जिल्हा परिषदेच्या सदस्यांमध्ये या संदर्भातील उत्सूकता अधिक आहे. बहुतांशी जिल्हा परिषद सदस्यांना आमदारकीचे स्वप्न पडून त्यांनी त्या दृष्टीने तयारीही चालविली असली तरी, युती, आघाडीकडून जागा कोणाला सुटते त्यावर पक्षांतर करण्यासाठी पक्ष ठरविण्याची भूमिका घेण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेचे सदस्य असताना विधानसभा निवडणूक लढवून विजयी झालेल्यांची प्रमाण जिल्ह्यात अधिक आहे. किंबहुना जिल्हा परिषदेनेच विधीमंडळाचे कवाडे खुले करून दिले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या किमान दहा ते पंधरा टक्के सदस्यांना प्रत्येक विधानसभा निवडणुकीचे वेध लागतात. यंदा मात्र काहीशी वेगळी परिस्थिती असून, विरोधी पक्षाचे आमदार व वरिष्ठ पदाधिकारी मोठ्या संख्येने सत्ताधारी भाजप-सेनेकडे आकृष्ट होऊ लागल्याने दररोज पक्षांतराचे सोहळे रंगू लागले आहेत. त्यामुळे निवडणुकीला सामोरे जाण्यापुर्वी विरोधी पक्ष गर्भगळीत झाल्याच्या अवस्थेत आहे. त्यामुळे गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून कॉँग्रेस व राष्टÑवादीकडून विधानसभा निवडणुकीची तयारी करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सदस्यांची घालमेल वाढली आहे. सत्ताधारी पक्षांकडे अगोदरच इनकमिंग अधिक असल्याने पक्षांतर करून उमेदवारी मिळेलच कोणतीही शाश्वती आजच्या घडीला कोणी देवू शकत नाही. अशा परिस्थितीत पक्षांतर करूनही उपयोग होईल काय असा प्रश्न त्यांना पडू लागला आहे. त्यातही भाजप व सेनेकडे असलेल्या इच्छुकांची संख्या पाहता, विधानसभा निवडणुकीत युती होण्याविषयीही या सदस्यांना साशंकता वाटू लागली आहे. सत्ताधाऱ्यांप्रमाणेच या सदस्यांनाही युती होऊच नये अशी वाटू लागले असून, तसे झाल्यास पक्षांतराचा विचार करणे अधिक योग्य व सोयीचे होईल असा त्यांचा ºहोरा आहे. त्यामुळे सध्या जिल्हा परिषदेत येणाºया सर्वपक्षीय सदस्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची व त्यातल्या त्यात मतदार संघातील उमेदवारांविषयीच चर्चा झडू लागली आहे.यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी उपाध्यक्ष नयना गावीत, बांधकाम सभापती मनिषा पवार, नितीन पवार, हिरामण खोसकर, भास्कर गावीत, अमृता पवार, सिमंतीनी कोकाटे, डॉ. आत्माराम कुंभार्डे, अश्विनी आहेर या जिल्हा परिषद सदस्यांसह झेरॉक्स म्हणून ओळखले जाणारे समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर यांचे पती माजी आमदार रामदास चारोस्कर, सदस्य अश्विनी आहेर यांचे पती जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष केदा आहेर, सदस्य रूपांजली माळेकर यांचे पती विनायक माळेकर, सदस्य बलवीर कौर यांचे पूत्र बंटी गिल यांचे नावे चर्चेत आहेत. प्रत्येकाने आपल्यापरिने निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी केली असली तरी, उमेदवारी कोणाकडून करायची याचा निर्णय अधांतरीत ठेवण्यात आला आहे. निवडून आणण्याची क्षमता ठेवणाºया व सध्या हवा असलेल्या पक्षाकडेच या सदस्यांचा सर्वाधिक ओढा दिसत आहे.

टॅग्स :Politicsराजकारणnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद