शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपट्टी, दलित वस्तीच्या कामांवर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 00:57 IST

ग्रामीण पाणीपुरवठा योजनांवर होणारा खर्च व मिळाणारे उत्पन्न तसेच दलित वस्तीच्या कामांवर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत चर्चा करण्यात येऊन प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांवर होणारा खर्च यापुढे शासनाकडून घेण्यात यावा, असा ठराव करण्यात आला. तर दलित वस्तीत यापुढे हायमास्ट दिवे न बसविण्याचा निर्णय घेण्यात आला  आहे. 

नाशिक : ग्रामीण पाणीपुरवठा योजनांवर होणारा खर्च व मिळाणारे उत्पन्न तसेच दलित वस्तीच्या कामांवर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत चर्चा करण्यात येऊन प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांवर होणारा खर्च यापुढे शासनाकडून घेण्यात यावा, असा ठराव करण्यात आला. तर दलित वस्तीत यापुढे हायमास्ट दिवे न बसविण्याचा निर्णय घेण्यात आला  आहे. प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनांच्या वसुलीचा आढावा स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आला. त्यावेळी यंदा २७ लाख रुपये वसुली झाल्याचे सांगण्यात आले. कोरोनामुळे यंदा वसुलीवर परिणाम झाल्याची कबुली देण्यात आली. नांदगावसह ५६ खेडी पाणीपुरवठा योजनेकडे एक कोटी ८७ लाख रुपये थकबाकी असून, त्याच्या वसुलीसाठी नांदगाव नगरपालिकेशी पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती कार्यकारी अभियंता नरवडे यांनी दिली. नांदगाव नगरपालिकेने पाणीपट्टीची रक्कम जादा असल्याचे कारण देत थकबाकी न भरण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेतला असला तरी, मुख्याधिकारींशी यासंदर्भात चर्चा झाली असून, दरवाढीचा प्रस्ताव त्यांना मान्य आहे. येत्या १५ फेब्रुवारी रोजी नांदगाव नगरपालिकेची बैठक होणार असून, त्यात या संदर्भात निर्णय होणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी बैठकीत दिली, तर ५६ गाव पाणीपुरवठा  योजनेला एकदा भेट देऊन या योजनेवरील खर्च कसा कमी करता येईल यासंदर्भात चर्चा केली जावी, अशी सूचना अध्यक्ष क्षीरसागर यांनी केली. प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांवर कार्यरत असलेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन शासनाकडून घेण्याचे तर कंत्राटी कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेकडून वेतन देण्यात आले, तर खर्चात कपात होऊ शकते, असेही बैठकीत सांगण्यात आले. दलित वस्ती सुधार योजनांमध्ये बसविण्यात येणारे हायमास्ट महिनाभरातच बंद पडत असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. त्यावर समाजकल्याण समितीने यापुढे दलित वस्तीत हायमास्ट न बसविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती देण्यात आली तसेच दलित वस्तीतील कामांचे ४०० प्रस्तावांची छाननी करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.  या बैठकीस उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, सभापती  संजय बनकर, सुरेखा दराडे, अश्विनी आहेर, रवींद्र शिंदे आदी उपस्थित  होते. ग्रामपंचायतींची तपासणीजिल्ह्यातील ग्रामपंचायतींची लवकरच तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिली. त्यासाठी सर्व गट विकास अधिकारी व विस्तार अधिकाऱ्यांना दप्तर अद्ययावत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, लवकरच खातेप्रमुख या ग्रामपंचायतींची तपासणी करतील, असे सांगून बनसोड यांनी शाळांचेही दप्तर अद्ययावत करण्यात यावे त्यांचीही तपासणी केली जाणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदPoliticsराजकारण