शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
3
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
4
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
5
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
6
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
7
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
8
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
9
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
10
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
11
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
12
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
13
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
14
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
15
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
16
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
17
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
18
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
19
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
20
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात

नाशिकमध्ये पुन्हा दामदुप्पट योजनेची चर्चा

By admin | Updated: May 10, 2015 00:12 IST

ट्रिपल एम : एका महिन्यात दुप्पट परतावा देण्याचा दावा

नाशिक : विविध प्रकारच्या गुंतवणूक आणि आकर्षक व्याजदराच्या चक्रव्यूहात अडकलेल्या नाशिककर गुंतवणूकदारांना गेल्या काही दिवसांपासून ट्रिपल एम या संस्थेच्या नावाचा आणखी एक मॅसेज येऊ लागला असून, त्या मॅसेजमध्ये अवघ्या महिनाभरात थेट दामदुप्पट रक्कम देण्याचा दावा करण्यात येत असल्याने सध्या नाशिककरांमध्ये हा चर्चेचा विषय ठरला आहे. एका महिन्यात ३० टक्क्यांपासून ते १०० टक्केपरतावा देण्याचा दावा करणाऱ्या या संस्थेच्या नावाने एक संकेतस्थळही कार्यरत असून, ‘एमएमएमइंडिया.नेट’ या नावाने ते सुरू आहे. संकेतस्थळावर संस्थेने टाकलेल्या माहितीपत्रकात बॅँक अथवा कंपनी असल्याचा उल्लेख कोठेही आढळत नाही. एका ठिकाणी ही संस्था फायनान्स कंपनी असल्याचा उल्लेख करते, मात्र त्यातही भारतीय कंपनी की, परदेशी कंपनी याचा उल्लेख नाही. कंपनीचा रजिस्टर क्रमांकही त्यात जाहीर करण्यात आलेला नसल्याने याबद्दल अधिकच साशंकता निर्माण होते. पैसे भरायचे कसे, त्याची परतफेड कशी होणार याबाबत कोणतीही माहिती या संकेतस्थळावर देण्यात आलेली नाही. केवळ एक व्यक्ती यात आॅनलाइन समुपदेशन करीत गुंतवणूकदाराने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देते. पैसे कसे मिळणार असे विचारले असता बॅँकेद्वारे तुमच्या खात्यावर जमा होतील असे उत्तर दिले जाते. यापेक्षा अधिक माहिती पाहिजे असेल तर तुमचा ई-मेल आयडी पाठवा, त्यावर माहिती पाठवू इतकेच उत्तर दिले जाते आणि ई-मेलवर काही लिंक पाठविल्या जातात. त्याद्वारे तुमचे अकाउंट उघडा व व्यवहार सुरू करा, अशी माहिती दिली जाते. कार्यालय पंजाबलाया संस्थेचा व्यवहार संपूर्ण जगभरात चालविला जात असून, त्याचे कार्यालय केवळ पंजाबमध्येच असल्याचे उत्तर दिले जाते. त्यामुळे कागदपत्रांचे कोणतेच वास्तविक रेकॉर्ड नसणाऱ्या या संस्थेचे व्यवहार चालतात तरी कसे याबद्दल कोणतीच माहिती नव्या गुंतवणूकदाराला दिली जात नाही. केवळ इंटरनेटवरच आॅनलाइन माहिती दिली जाते. ५०० रुपयांपासून सुरुवातमहिनाभरात दामदुप्पट या योजनेअंतर्गत सहभागी होणाऱ्या गुंतवणूकदाराला किमान ५०० रुपये गुंतवावे लागतात, तर या पटीत अमेरिकन डॉलरमध्येही गुंतवणूक करता येते. या गुंतवणुकीवर बोनस देण्यात येत असल्याचेही कंपनीकडून सांगितले जाते. त्यावर बोनस आणि रकमेची परतफेड कशी होते हे दाखविणाऱ्या अनेक चित्रफित संकेतस्थळावर टाकण्यात आल्या असून, त्याद्वारे त्याची माहिती दिली जाते. परंतु त्यातील एकही माणूस परिचित अथवा खात्रीशिररीत्या सांगतो आहे असे वाटत नाही. तो केवळ जाहिरातीचाच एक भाग वाटतो.माहितीही संदिग्धया संस्थेच्या संकेतस्थळावर देण्यात आलेली माहितीही संदिग्ध स्वरूपातील असून, त्यातून कोणत्याच व्यवसायाचा बोध होत नाही. या रकमेचा वापर संस्था कशी करते? त्यातून इतक्या कमी कालावधीत दुप्पट परतावा कसा मिळतो, यासाठी संस्था पैसे कोठे वापरते याची कोणतीही माहिती संस्थेचे एजंट देत नाहीत. महाराष्ट्र आणि नाशिकमध्ये या संस्थेचा कारभार विस्तारलेला नसल्याने त्याची माहिती अद्याप कोणालाच नाही. त्यामुळे या संस्थेच्या विश्वासार्हतेबद्दलही साशंकता निर्माण होते आहे. (प्रतिनिधी)