शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
3
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
4
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
5
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
6
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
7
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
8
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
9
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
10
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
11
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
12
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
13
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
14
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
15
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

शिवसेना बैठकीत शिबिराच्या नियोजनावर चर्चा

By admin | Updated: April 11, 2016 00:12 IST

शिवसेना बैठकीत शिबिराच्या नियोजनावर चर्चा

नाशिक : आगामी महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढविण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला असून, त्यादृष्टीने तयारी सुरू झाली आहे़ नुकत्याच झालेल्या भाजपा पदाधिकारी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनेही येत्या २४ एप्रिल रोजी सेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकारी व लोकप्रतिनिधींच्या शिबिराचे आयोजन केले आहे़ या शिबिराच्या नियोजनाबाबत रविवारी (दि़१०) शिवसेना शहर कार्यालयात संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली़ या बैठकीत कार्यक्रमाची रूपरेषा व जबाबदाऱ्यांची निश्चिती करण्यात आली़शिवसेनेचे संपर्कप्रमुख अजय चौधरी, आमदार योगेश घोलप यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत नियोजनाबाबत सखोल चर्चा करण्यात आली़ गंगापूर नाक्याजवळील चोपडा बॅन्क्वेट हॉलमध्ये रविवारी (दि़ २४) सकाळी नऊ वाजता सेनेच्या उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकारी व लोकप्रतिनिधींच्या शिबिरास सुरुवात होणार आहे़ तर या शिबिराच्या समारोपप्रसंगी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची विशेष उपस्थिती असणार आहे़ या शिबिरामध्ये शेती व्यवसायासमोरील अडचणी व उपाय, शिवसेनेचा प्रवास, युवा संघटन, पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या आदि विषयांवर चर्चा केली जाणार असून, यामध्ये पानगुडे पाटील, गुलाबराव पाटील आदिंचा समावेश असणार आहे़या बैठकीला जिल्हाप्रमुख विजय करंजकर, डी़ जी़ सूर्यवंशी, अजय बोरस्ते आदिंसह शहर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते़ (प्रतिनिधी)