शहरं
Join us  
Trending Stories
1
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
2
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
3
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
4
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
5
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
6
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
7
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
8
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
9
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
10
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
11
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
12
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
13
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
14
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
15
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
16
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
17
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
18
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
19
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
20
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी

पाटात बुडालेल्या त्या बालकांचा शोध सुरूच

By admin | Updated: May 8, 2014 21:33 IST

विडी कामगार येथिल घटना :

विडी कामगार येथिल घटना : पंचवटी : सायंकाळच्या सुमाराला पाटात आंघोळीसाठी गेलेले विडीकामगार नगर येथिल दोघे लहान मुले पाटात बुडाल्याची शक्यता पोलीसांनी वर्तविली असुन आज दुसर्‍या दिवशी या मुलांचा शोध घेण्याचे काम सुरू होते. पाटाला पाणी सोडल्याने विडीकामगार नगर परिसरात राहणारे प्रणव मधुकर खेलूकर (८) व योगेश बाळकृष्ण मावळे (११) असे दोघे जण काल बुधवारी सायंकाळी पाच वाजता आदर्श शाळेजवळून वाहणार्‍या पाण्याच्या पाटात आंघोळीसाठी गेले होते. मात्र सायंकाळ झाल्यानंतर दोघेही घरी न परतल्याने त्यांच्या कुटूंबियांनी बालक पाण्यात बुडाल्याबाबत पोलीसांना माहीती दिली होती. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव महाजन यांनी स्वत: घटनास्थळी कर्मचार्‍यांसह धाव घेऊन अग्निशामक दलाला दूरध्वनीवरून माहीती कळविली होती त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी रात्री उशिरापर्यंत शोध घेतला मात्र विजपुरवठा खंडीत झाल्याने त्यातच पावसाच्या सरी बरसत असल्याने शोध मोहीमेत अडथळा निर्माण झाला होता. गुरूवारी सकाळी पुन्हा पंचवटी अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याच्या पाटात शोध मोहीम सुरू केली होती मात्र दुपारी तीन वाजेपर्यंत कोणाचाही मृतदेह हाती लागला नसल्याने मुले पाण्यात बुडाली की कोठे गेली याबाबत स्पष्ठोक्ती होऊ शकली नाही. (वार्ताहर) पाटाने घेतले सहा बळी दर महिन्याला पाटाला पाणी सोडले जात असल्याने अनेक तरूण तसेच बालगोपाळ पाण्याच्या पाटात आंघोळीसाठी गर्दी करतात. मात्र गेल्या काही दिवसांपुर्वी पाटाला पाणी सोडलेले असल्याने बालगोपाळांची गर्दी वाढतच आहे. वेगाने पाणी वाहणार्‍या पाटात खोलीचा अंदाज येत नसल्याने याच पाण्याच्या पाटात आतापर्यंत पाच ते सहा जणांचे बळी गेल्याची नोंद पोलीस दप्तरी करण्यात आली आहे. मखमलाबाद, वज्रेश्वरी तसेच आडगाव हद्दीतून वाहणार्‍या पाण्याच्या पाटात या घटना घडल्या आहेत.