शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील सहा धरणांमधून विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:14 IST

नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाल्याने, धरणांमधील पाण्याच्या पातळीतही वाढ होऊ लागली आहे. निम्म्यापेक्षा ...

नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाल्याने, धरणांमधील पाण्याच्या पातळीतही वाढ होऊ लागली आहे. निम्म्यापेक्षा अधिक धरणांमधील पाण्याची पातळी ९० टक्क्यांच्या पुढे गेल्याने विसर्गला सुरुवात करण्यात आली आहे. सद्यस्थितीत सहा धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. रविवारी सकाळपासून गंगापूर धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.

इगतपुरी तालुक्यात पावसाचा जोर वाढल्याने गंगापूर धरण समूहात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली असल्याने, दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येत आहे. रविवारी दुपारी १२ वाजेपासून दारणासह कडवा, आळंदी, वालदेवी, नांदुरमध्यमेश्वर, तसेच गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दारणामधून १०,०६०, कडवामधून १,६९६, आळंदीमधून ३०, वालदेवी धरणातून १८३ , नांदुरमध्यमेश्वर येथून १३,४२७ तर गंगापूर धरणातून ५५३ क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग केला जात आहे. इगतपुरी तालुक्यात पावसाचा जोर वाढत असल्याने, दुपारी तीन वाजेनंतर दारणा धरणातून होणारा विसर्ग १२ हजार ७८८ क्युसेक इतका करण्यात आला. सकाळी एक हजार क्युसेक इतकाच विसर्ग केला जात होता.

धरणांमधून विसर्ग सुरू झाल्याने, नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास रात्री उशिरापर्यंत पाण्याचा विसर्ग वाढविला जाण्याचीही शक्यता आहे. मागील वर्षी गंगापूर धरणातून जवळपास दोन हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्याची वेळ आली होती. यंदा मागील वर्षीच्या तुलनेत विसर्ग कमी होण्याची शक्यता आहे. धरण समूहातील इतर धरणांमध्ये अपेक्षित पाणी जमा झाले नसल्याने गंगापूरमधून होणारा विसर्ग मर्यादित राहाणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गौतमी, कश्यपी धरणाच्या पाण्याची पातळीत वाढ हेात आहे.