शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षे झालेल्या अधिकाऱ्यांवर अविश्वास

By admin | Updated: October 16, 2016 02:35 IST

न.पा. निवडणूक : अधिकाऱ्यांच्या नेमणुकीचा प्रश्न

नाशिक : डिसेंबरमध्ये होऊ घातलेल्या राज्यातील २१४ नगरपालिकांच्या निवडणूक कामांपासून जिल्ह्णात तीन वर्षे सेवेचे पूर्ण झालेल्या महसूल खात्याच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना दूर सारण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतल्याने एक प्रकारे हा अधिकाऱ्यांवर अविश्वास असल्याची भावना व्यक्त केली जात असून, दुसरीकडे निवडणुका निष्पक्षपातीपणे पार पाडण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे समर्थन केले जात आहे.डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत मुदत संपणाऱ्या नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकांबाबत राज्य निवडणूक आयोगाने नियम तयार केले असून, या निवडणुका बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार असून, नगरपालिकेच्या नगराध्यक्षांची निवड थेट जनतेमधून केली जाणार आहे. या निवडणुका निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडण्याची संपूर्ण जबाबदारी जिल्हाधिकारी व पर्यवेक्षक अधिकारी म्हणून विभागीय आयुक्तांवर सोपविण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक अधिकारी व मतदान केंद्राध्यक्ष यांच्या नेमणुकीबाबतही आयोगाने काही मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली आहेत. त्यासाठी प्रत्येक नगरपालिकेसाठी स्वतंत्र उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार असून, जिल्ह्णात आवश्यकतेप्रमाणे उपजिल्हाधिकारी नसतील तर विभागीय आयुक्तांनी इतर जिल्ह्णांमधून आवश्यकतेनुसार उपजिल्हाधिकारी उपलब्ध करून द्यावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांच्या नेमणुका करताना त्या अधिकाऱ्याची सचोटी, प्रामाणिकपणा व त्यास निवडणुकीचा अनुभव असणे आवश्यक केले आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची नेमणूक करताना त्यास त्याच जिल्ह्णात तीन वर्षे झालेले नसावेत, तसेच तो जिल्ह्णाचा स्थानिक रहिवासी नसावा, यावर आयोगाने विशेष भर दिला आहे.