शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
7
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
8
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
9
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
10
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
11
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
12
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
13
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
14
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
15
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
16
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
18
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
19
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
20
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी

आपत्ती कधीही येऊ शकते व्यवस्थापन कार्यशाळा : मेजर जनरल दत्ता यांचे मार्गदर्शन

By admin | Updated: May 30, 2014 01:03 IST

नाशिक : आपत्तीपासून कोणताही देश चुकलेला नाही. ती केव्हाही व कधीही येऊ शकते. त्यामुळे आज तयारी केली आणि दुसर्‍या दिवशी बेसावध राहिलो तर उपयोग नाही, असे सांगत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनतज्ज्ञ मेजर जनरल दत्ता यांनी संभाव्य आपत्ती व त्यापासून होणार्‍या हानीपासून वाचण्याबाबत बारीकसारीक गोष्टींची माहिती जिल्‘ातील शासकीय अधिकार्‍यांना दिली. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणार्‍या कोट्यवधी भाविकांच्या गर्दीचे नियोजन करणे सहज शक्य असल्याचेही त्यांनी सांगितले.

नाशिक : आपत्तीपासून कोणताही देश चुकलेला नाही. ती केव्हाही व कधीही येऊ शकते. त्यामुळे आज तयारी केली आणि दुसर्‍या दिवशी बेसावध राहिलो तर उपयोग नाही, असे सांगत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनतज्ज्ञ मेजर जनरल दत्ता यांनी संभाव्य आपत्ती व त्यापासून होणार्‍या हानीपासून वाचण्याबाबत बारीकसारीक गोष्टींची माहिती जिल्‘ातील शासकीय अधिकार्‍यांना दिली. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणार्‍या कोट्यवधी भाविकांच्या गर्दीचे नियोजन करणे सहज शक्य असल्याचेही त्यांनी सांगितले. सिंहस्थ कुंभमेळ्याशी निगडित असलेल्या सर्व शासकीय खात्याच्या प्रमुखांसाठी गुरुवारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात प्रत्येक कार्यालयाने आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीबाबत सादरीकरण केल्यानंतर त्यातील प्रत्येक मुद्द्याचा आधार घेऊन दत्ता यांनी मार्गदर्शन केले. अनादी काळापासूनच जगात आपत्ती येत आहेत. त्यामुळे हा विषय आत्ताच सुरू झाला असे नाही, तर यापूर्वी आपत्ती कशी हाताळावी याविषयी साधनसामग्री व समन्वय नसल्याने जीवित व मनुष्यहानी सोसावी लागली. आता मात्र जागतिक पातळीवरच हा विषय गांभीर्याने घेण्यात आल्याने आपत्तीत मृतांना बाहेर काढण्याऐवजी जीवितहानी कशी होणार नाही किंवा कमी होईल याला प्राधान्य दिले जाऊ लागले आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यातील गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जाण्या-येण्यासाठी स्वतंत्र रस्ते, स्नानासाठी विशिष्ट वेळ व जत्थ्याला प्राधान्य, जितकी जागा तितक्याच भाविकांची व्यवस्था या गोष्टी महत्त्वाच्या असल्याचे दत्ता यांनी सांगितले. आपत्ती कोठेही घडू शकते हे लक्षात घेऊन सिंहस्थ कुंभमेळ्यातील महत्त्वाच्या ठिकाणी रुग्णवाहिका, शववाहिका, पोलीस, अग्निशामक दल, मदतकार्य पोहोचविणारी वाहने सहजपणे ये-जा करू शकतील यासाठी त्यांना स्वतंत्र मार्ग खुला करण्याची सूचनाही त्यांनी केली. कोणत्या प्रकारची आपत्ती येऊ शकते याचा अभ्यास करून त्या-त्या आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी स्वतंत्र पथक सर्व साधनसामग्रीसह सज्ज ठेवल्यास परिस्थिती हाताळणे कठीण नसल्याचेही दत्ता यांनी सांगितले. दिवसभर चाललेल्या या कार्यशाळेस जिल्हाधिकारी विलास पाटील, महापालिका आयुक्त संजीवकुमार, पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल, अपर पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्यासह सर्व शासकीय खात्यांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.