नाशिक : दुबईला फिरण्यासाठी जाणाऱ्या मुलाच्या तिकिटासाठी दिलेली रक्कम पुण्याच्या दोघांनी लंपास केल्याची घटना असून, या प्रकरणी त्यांच्यावर अंबड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सिडकोतील कामटवाडे कमलनगरमधील अभिजित पार्कमधील रहिवासी विद्याधर पांडुरंग शेजॉय यांच्या मुलाला दुबईला फिरण्यासाठी जायचे होते़ मुलाच्या तिकिटासाठी त्यांनी संशयित अशोक तुकाराम मेश्राम उर्फ परांजपे (रा़पाषाणरोड, पुणे) व मनोज उर्फ दिनेश मनसुखलाल ओस्वाल (रा़बाबू गेणू रोड, देवळाली गाव, नाशिकरोड) या दोघांकडे १८ ते २१ मार्च २०१५ दरम्यान ५२ हजार रुपये दिले होते़ मात्र, या दोघा संशयितांनी तिकीट वा पैसे परत न करता या रकमेचा अपहार केला़ या प्रकरणी शेजॉय यांनी अंबड पोलीस ठाणे गाठत या दोघांविरोधात फिर्याद दिली़
दुबईच्या तिकिटासाठी दिलेल्या रकमेचा अपहार
By admin | Updated: January 25, 2016 23:37 IST