शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्तीसाठी आॅनलाइनचा आग्रह सोडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 01:26 IST

नाशिक : गेल्या वर्षी शिष्यवृत्तीसाठी आॅनलाइनचा आग्रह धरल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवणाऱ्या समाजकल्याण विभागाने त्यापासून बोध घेत यंदा विद्यार्थी व महाविद्यालयांना आॅफलाइन अर्ज सादर करण्याच्या सूचना दिल्या असून, आर्थिक वर्ष संपुष्टात येण्यासाठी अवघे पंधरा दिवस शिल्लक असल्याचे पाहून येत्या दोन दिवसांत तातडीने अर्ज सादर करण्याची मुदत दिली आहे.

ठळक मुद्देदोन दिवसांची मुदतसमाजकल्याण विभागाकडून आॅफलाइन अर्ज करण्याचे आवाहन

नाशिक : गेल्या वर्षी शिष्यवृत्तीसाठी आॅनलाइनचा आग्रह धरल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवणाऱ्या समाजकल्याण विभागाने त्यापासून बोध घेत यंदा विद्यार्थी व महाविद्यालयांना आॅफलाइन अर्ज सादर करण्याच्या सूचना दिल्या असून, आर्थिक वर्ष संपुष्टात येण्यासाठी अवघे पंधरा दिवस शिल्लक असल्याचे पाहून येत्या दोन दिवसांत तातडीने अर्ज सादर करण्याची मुदत दिली आहे.केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गत सन २०१७-१८ मधील प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षासाठी नूतनीकरण अर्ज व सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षासाठी नवीन आॅफलाइन अर्ज भरण्याच्या सूचना यापूर्वीच समाजकल्याण विभागाने सर्व महाविद्यालयांना दिल्या होत्या, परंतु सहायक आयुक्त कार्यालयाकडे बहुतांशी महाविद्यालयांनी फक्त नूतनीकरणाचेच अर्ज दाखल केले आहेत. सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षासाठी नवीन नूतनीकरणाचे आॅफलाइन अर्ज काही महाविद्यालयांनी सादर केले नाहीत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयांनी १६ मार्चपूर्वी नवीन व नूतनीकरणाचे आॅफलाइन अर्ज समाजकल्याण विभागाकडे पाठवावेत, असे आवाहन सहायक समाजकल्याण आयुक्त प्राची वाजे यांनी केले आहे. चालू आर्थिक वर्ष संपण्यास पंधरा दिवस शिल्लक आहेत.सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षामध्ये शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क योजनेंतर्गत लाभ अदा करण्यासाठी सुधारित कार्यपद्धती शासनाने जानेवारीत काढलेल्या आदेशात नमूद असून, त्यानुसार विजाभज, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाच्या केंद्र व राज्य योजनांमधील शंभर टक्के निधी विद्यार्थ्यांना मंजूर करण्याचे आदेश शासनाने दिलेले आहेत. जानेवारीच्या शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती प्रवर्गाचे सन २०१७-१८ मधील प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षांचे नूतनीकरण अर्ज आॅनलाइन प्रणालीद्वारे त्या त्या महाविद्यालयांनी आॅनलाइन पद्धतीने आणि सन २०१७-१८ मधील नवीन आॅफलाइन अर्ज विहित नमुन्यात अचूक माहितीसह सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार १६ मार्चपूर्वी महाविद्यालयांनी सदरचे अर्ज सादर करावेत त्यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असेही वाजे यांनी म्हटले आहे.महाविद्यालयांवर जबाबदारीसामाजिक न्याय विभागामार्फत राबविल्या जाणाºया योजनेनुसार कोणीही विद्यार्थी शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी पासून वंचित राहणार नाही याची दक्षता महाविद्यालयांनी घ्यावी. जर कोणी विद्यार्थी शैक्षणिक सवलतीपासून वंचित राहिल्यास त्यांची संपूर्ण जबाबदारी महाविद्यालयांच्या प्राचार्यांची राहील, असा इशाराही प्राची वाजे यांनी दिला आहे.