शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय प्रवेशापासून विद्यार्थी वंचित

By admin | Updated: September 13, 2016 01:30 IST

घोळ प्रवेशाचा : खासगी, अभिमतचे स्वतंत्र वेळापत्रक; राज्यातील विद्यार्थ्यांकडून नाराजी

नाशिक : वैद्यकीय विद्याशाखेच्या केंद्रीय प्रवेशप्रक्रियेला आव्हान देत खासगी वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयाने ऐनवेळी न्यायालयाकडून स्थगिती मिळविल्याने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. या स्थगितीमुळे राज्याबाहेरील विद्यार्थ्यांना अभिमत आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांचे दरवाजे खुले झाले असून, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या जागांवर आता परराज्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे. या प्रकारानंतर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनीही न्यायालयात याचिका दाखल केली असून, येत्या बुधवारी यासंदर्भातील सुनावणी होणार आहे. वैद्यकीय महाविद्यालयांचे प्रवेश हे नीटनुसारच करण्यात यावेत, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील १७ खासगी आणि १० अभिमत विद्यापीठांमध्ये प्रवेशप्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली होती. ३० आॅगस्ट रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याच्या दोन दिवस आधीच एक खासगी आणि दंत महाविद्यालयांनी न्यायालयात या प्रक्रियेला आव्हान देत प्रवेशप्रक्रिया केवळ ८५ टक्केमहाराष्ट्राच्या कोट्याप्रमाणे न राबविता आॅल इंडिया पातळीवर राबविण्यात यावी अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. न्यायालयाने याचिका दाखल करून घेत पूर्वीच्या प्रवेशप्रक्रिया स्थगित करून आॅल इंडिया स्तरावर प्रवेशप्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थी अडचणीत आले आहेत. महाराष्ट्रामध्ये १७ खासगी व दहा अभिमत महाविद्यालये आहेत. त्यातील एमबीबीएसची प्रवेश क्षमता ही ३५००, तर बीडीएसची प्रवेशक्षमता ३००० इतकी आहे. या दोन्ही शाखा मिळून सुमारे ६५०० प्रवेश हे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या हक्काचे असताना या जागांवर परराज्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश देता कामा नये, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. केंद्रीय प्रवेशप्रक्रियेला स्थगिती मिळविल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांचे हाल झाले आहेत. अभिमत आणि खासगी महाविद्यालयांनी आपल्या संस्थेचे प्रवेश वेळापत्रक जाहीर करताना तीन ते चार महाविद्यालयांनी एकाच दिवशी विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी बोलविले आहे. विशेष म्हणजे प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र डी. डी. लागत असल्याने विद्यार्थी, पालकांची प्रचंड ओढाताण होत आहे. या त्रासामुळे अनेक विद्यार्थी हे प्रवेशापासून वंचित राहत असून, या जागांवर परप्रांतियांना प्रवेश देण्याचा आग्रह खासगी आणि अभिमत महाविद्यालयांकडून धरला जात आहे. यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत. नाशिकमधील काही विद्यार्थ्यांनी याप्रकरणी मोहीम उघडली असून, मंत्रिमंडळाने यात लक्ष घालावे, अशी मागणी करताना जिल्ह्यातील मंत्र्यांना निवेदने दिली जात आहेत.