शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

काम अर्धवट असल्याने गैरसोय

By admin | Updated: August 2, 2016 01:00 IST

ओझर : महामार्ग ओलांडताना नागरिकांचा जीव धोक्यात

ओझर : महामार्गालगत असलेल्या ओझर परिसरातील नागरिकांना वेगवान वाहनांच्या गतीमुळे रस्ता ओलांडणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. अजून किती दिवस ओझरकारांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागेल असा संतप्त सवाल येथील नागरिकांनी विचारला आहे. अनेक वर्षांपासून अर्धवट असलेले महामार्गाचे काम अद्याप अर्धवट असल्यामुळे हा धोका कायम आहे.ओझर पूर्वी एक गाव होते. परंतु आता आजूबाजूला उदयास आलेली सर्व नगरे पाहता आता ओझर गावाने उपनगराकडे झेप घेतली आहे. यातील शेकडो नागरिक हे महामार्गाच्या दोन्ही बाजूने गावात ये-जा करतात.ओझरची मुख्य वस्ती गावाच्या पलीकडे आहे. त्यामध्ये एरफोर्स स्टेशन आर.के. कॉलनी लोहिया नगर, शिवाजी नगर, संजीवनी नगर, दत्तनगर, रावसाहेब कॉलनी, चौरे मळा आदिंचा समावेश आहे. येथे राहणाऱ्या प्रत्येक नागरिकास महामार्ग ओलांडूनच गावात यावे लागते. सध्या सायखेडा फाटा ते पाटील संकुलपर्यंत जुन्या रस्त्यावरून वाहने ये-जा करतात कारण , इथली जी काही मंजूर कामे आहेत ती लाल फितीत अडकली आहेत. सायखेडा फाटा परिसरात तर रस्त्यावर पडलेले खड्डे चुकवायचे की आडव्या जाणाऱ्या वाहनांच्या वेगाचा अंदाज घायचा या विचारांमध्ये वाहनचालक असतात. यामुळे येथे अनेक अपघात झाले आहेत. त्यामध्ये अनेक जीव गेले. यापुढे शेतकऱ्यांची ये-जा असलेले खंडेराव मंदिर परिसर तर सध्या धोकादायक बनले आहे. कारण या मंदिराशेजारी असलेल्या शाळेतील विद्यार्र्थी तर महामार्ग पोलिसांच्या मदतीशिवाय ओलांडूच शकत नाही. तुकाराम कॉम्प्लेक्सजवळ हीच परिस्थिती आहे. गावात मंगळवारी आठवडे बाजार असतो. यासाठी ओसंडून रस्त्यावर ओसंडून गर्दी वाहत असते. वाहनांची भररस्त्यात केलेली पार्कींग अपघाताला आमंत्रण देणारी आहे.काही महिन्यांपूर्वी येथे मोठा अपघात झाला होता. यात मालेगावच्या पाच लोकांना प्राण गमवावे लागले होते. गडाख कॉर्नर परिसरात अशीच परिस्थिती आहे. ओझर गावात सर्वात मोठा दुचाकी वाहनांचा बाजार भरतो. या बाजाराच्या मागे मोठी वसाहत आहे. एरफोर्सला ये-जा करणाऱ्या कामगारांची संख्या मोठी आहे. पाटील संकुल येथील कामगार थोडे विरु द्ध दिशेस येऊन महामार्ग ओलांडून कामावर जातात. सतत प्रवाशांची रेलचेल असूनही सर्व्हिस रोड पूर्ण झालेला नाही. संपूर्ण जुन्या रस्त्याला तर जागोजागी मोठे खड्डे पडलेले आहेत. अलीकडे वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. अजून किती दिवस ओझरकारांनी सहन करावं? महामार्ग प्राधिकरणला अजून जाग कशी आलेली नाही, असा सवाल विचारला जात आहे. (वार्ताहर)